AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs LSG : सूर्यकुमार यादवचा महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

Suryakumar Yadav Records Mumbai Indians : सूर्यकुमार यादव याने आपल्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध अर्धशतकी खेळी केली. सूर्याने यासह इतिहास घडवला.

MI vs LSG : सूर्यकुमार यादवचा महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
Suryakumar Yadav MI vs LSG Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 27, 2025 | 8:22 PM
Share

मुंबई इंडियन्सचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात इतिहास घडवला आहे. सूर्याने रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहली या सारख्या दिग्गज फलंदाजांना माग टाकत कीर्तीमान केला आहे. सूर्या आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान 4 हजार धावा करणार पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच सूर्याने वेगवान 4 धावा करणारा एकूण तिसरा फलंदाज होण्याचा बहुमानही आपल्या नावावर केला आहे. सूर्याआधी मिस्टर 360 अर्थात एबी डीव्हीलियर्स आणि ख्रिस ग्रेल या दोघांनी अशी कामगिरी केली होती.

सूर्यकुमारला लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्याआधी हा महारेकॉर्ड करण्यासाठी अवघ्या 33 धावांची गरज होती. सूर्याने लखनौ विरुद्ध 14 व्या ओव्हरमध्ये आवेश खान याच्या बॉलिंगवर फोर लगावला. सूर्याने यासह 4000 हजार धावा पूर्ण केल्या. सूर्याने यासह सर्वात कमी चेंडू 4 हजार धावा पूर्ण करत ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरैश रैना याचा रेकॉर्ड ब्रेक केला.

सूर्यकुमार यादव 12 वा भारतीय

सूर्यकुमार यादव 4 हजार धावा करणारा 12 वा भारतीय ठरला आहे. सूर्यकुमार यादव याच्याआधी विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना यासारख्या फलंदाजांनी 4 हजार धावा केल्या. मात्र सूर्यकुमार प्रमाणे या वरील फलंदाजांना वेगवान 4 हजार धावा करता आल्या नाहीत.

आयपीएलमध्ये कमी चेंडूत 4 हजार धावा

  1. एबी डीव्हीलियर्स : 2658
  2. ख्रिस गेल : 2658
  3. सूर्यकुमार यादव : 2714
  4. डेव्हिड वॉर्न : 2809
  5. सुरैश रैना :2881

150 षटकार

सूर्याने लखनौ विरुद्ध आणखी एक कारनामा केला. सूर्याने आयपीएलमध्ये 150 षटकारांचा टप्पा पूर्ण केला. सूर्या अशी कामगिरी करणारा 13 वा भारतीय फलंदाज ठरला. सूर्याने लखनौ विरुद्ध पहिलाच षटकार लगावता ही कामगिरी केली.  सूर्याने लखनौ विरुद्ध 28 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 192.86 च्या स्ट्राईक रेटने 54 धावा केल्या.

एकच वादा सूर्या दादा

IPL 2025 मधील कामगिरी

दरम्यान सूर्याने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. सूर्याने या हंगामात एकूण 10 सामन्यांमध्ये 252 बॉलमध्ये 169.44 च्या स्ट्राईक रेटने आणि 61 च्या सरासरीने एकूण 427 धावा केल्या आहेत. सूर्याने या हंगामात आतापर्यंत 3 अर्धशतकं झळकावली आहेत.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.