Suryakumar Yadav IPL 2023 : सूर्यकुमार OUT झाल्यानंतर Virat Kohli ची मन जिंकून घेणारी कृती, VIDEO व्हायरल

Suryakumar Yadav IPL 2023 : सूर्यकुमार यादव मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. काल रात्री वानखेडेवर सूर्यकुमार यादवच्या वादळात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पालापाचोळा झाला. सूर्यकुमार मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला.

Suryakumar Yadav IPL 2023 : सूर्यकुमार  OUT झाल्यानंतर Virat Kohli ची मन जिंकून घेणारी कृती, VIDEO व्हायरल
Suryakumar Yadav mi vs rcb ipl 2023
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 8:01 AM

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर काल मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना झाला. दोन्ही टीम्ससाठी महत्वाच्या असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 विकेट राखून विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 6 बाद 199 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने अवघ्या 16.3 ओव्हर्समध्ये 200 धावांच विजयी लक्ष्य गाठलं. मुंबईने RCB वर मोठा विजय मिळवत या सीजनमध्ये झालेल्या पहिल्या पराभवाचा वचपा काढला.

सहाजिकच मुंबई इंडियन्सला या मोठ्या विजयाचा रनरेटमध्ये फायदा होणार आहे. मुंबई इंडियन्सने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये थेट तिसऱ्या स्थानावर धडक मारली आहे.

सामन्याची दिशाच बदलून टाकली

मुंबई इंडियन्सचे आता तीन सामने बाकी आहेत. प्लेऑफ प्रवेशासाठी मुंबईसाठी आता प्रत्येक सामना महत्वाचा असेल. मुंबई इंडियन्सने काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर मिळवलेल्या विजयाचा हिरो ठरला, सूर्यकुमार यादव. त्याने 35 चेंडूत 83 धावा फटाकवून सामन्याची दिशाच बदलून टाकली.

विराट कोहलीने दिली दाद

सूर्याच्या झंझावातापुढे 200 धावा सुद्धा छोटं लक्ष्य ठरलं. सूर्याने त्याच्या इनिंगमध्ये 7 फोर आणि 6 सिक्स मारले. सूर्यकुमार यादवच्या या इनिंगच मुंबई इंडियन्स टीम, फॅन्स यांनी कौतुक केलच. पण प्रतिस्पर्धी टीमने सुद्धा सूर्याच्या इनिंगला दाद दिली. खासकरुन विराट कोहलीने.

काय केलं विराटने ?

याच विराटने काही वर्षांपूर्वी आयपीएल सामन्यात सूर्यकुमार यादवला राग दिला होता. त्याच विराटने काल सूर्या बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत असताना, त्याला थांबवलं व मिठी मारली. सूर्याच्या झंझावातापुढे RCB फ्लॉप

सहाजिकच या तुफान खेळीनंतर सूर्यकुमार यादव सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने काल वानखेडे स्टेडियमवर चौफेर फटकेबाजी केली. बँगलोरच्या कुठल्याही बॉलरला दया-माया दाखवली नाही. सूर्याच्या झंझावातापुढे RCB फ्लॉप ठरली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.