MI vs SRH IPL 2022: मुंबईचे ८ कोटी वसूल होता होता राहिले! टीम डेविड आणखी ८ बाॅल खेळला असता तर….VIDEO

हैदराबादने मुंबई इंडियन्सवर अवघ्या 3 धावांनी विजय मिळवला. मुंबईने हा सामना गमावला असला, तरी टिम डेविडने सर्वांची मन जिंकली. त्याच्यामुळे हा सामना रोमांचक स्थितीमध्ये पोहोचला होता.

MI vs SRH IPL 2022: मुंबईचे ८ कोटी वसूल होता होता राहिले! टीम डेविड आणखी ८ बाॅल खेळला असता तर….VIDEO
Mumbai Indians Tim davidImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 12:04 AM

मुंबई: आज वानखेडे स्टेडियमवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना आणि घरी बसून सामना पाहणाऱ्या क्रिकेट रसिकांना एक पैसा वसूल मॅच पहायला मिळाली. शेवटच्या दोन चेंडूपर्यंत या सामन्यातील रोमांच टिकून होता. मुंबईसाठी तसा हा सामना फक्त औपचारिकता मात्र होता. कारण मुंबई इंडियन्सच (Mumbai Indians) प्लेऑफमधील आव्हान केव्हाच संपुष्टात आलय. पण सनराजयर्स हैदराबादला (SRH) प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजय आवश्यक होता. सनरायजर्स हैदराबादने हा सामना जिंकला. पण फक्त एक विजय म्हणून हैदराबादच्या खात्यावर या सामन्याची नोंद होईल. ही मॅच खऱ्या अर्थाने रंगतदार बनवली ती, टिम डेविडने. (Tim david) त्याने तमाम क्रिकेट रसिकांची मन जिंकली. मुंबईची धावसंख्या चार बाद 127 असताना 16 व्या षटकात टिम डेविड मैदानावर आला.

मुंबई हरली पण डेविडने जिंकलं, ते का? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

डेविड फक्त तीन ओव्हर क्रीझवर होता

तो फक्त तीन ओव्हर्स खेळपट्टीवर होता. पण त्याने ही तीन षटकं गाजवली. एका तुफानप्रमाणे खेळून गेला. 18 चेंडूत 46 धावा करताना तो तुफानी खेळी खेळून गेला. मुंबई इंडियन्सने मेगा ऑक्शनमध्ये 8 कोटी पेक्षा जास्त रक्कम मोजून टिम डेविडला विकत घेतलं होतं. तो आणखी 8 चेंडू खेळपट्टीवर टिकला असता, तर कदाचित सामन्याच चित्र वेगळं असतं. पण एक धाव घेण्याच्या प्रयत्नात घात झाला. नटराजनने त्याला रनआऊट केलं. खिन्न मनाने डेविड पॅव्हेलियनमध्ये परतला. डेविड गेल्यानंतरही मुंबई जिंकेल, असं वाटत होतं. कारण 12 चेंडूत विजयासाठी 19 धावांची आवश्यकता होती. पण भुवनेश्वर कुमारने 19 व षटक निर्धाव टाकलं. या षटकात त्याने डेब्यू करणाऱ्या संजय यादवला शुन्यावर आऊट केलं. तिथेच सामना मुंबईच्या हातून निसटला होता.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

डेविडला इतके सामने बाहेर का बसवलं?

अखेरच्या षटकात विजयासाठी 19 धावांची आवश्यकता होती. रमणदीप सिंहने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. पण मुंबईचा 3 धावांनी पराभव झाला. सनरायजर्स हैदराबादने मुंबईला विजयासाठी 194 धावांचे टार्गेट दिलं होतं. मुंबईने निर्धारित 20 षटकात सात बाद 190 धावा केल्या. टिम डेविडचं धावबाद होणं, नक्कीच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या जिव्हारी लागलं. कारण तो खूप मोक्याच्या क्षणी आऊट झाला. आज डेविडची बॅटिंग पाहिल्यानंतर त्याला इतके सामने बाहेर का बसवलं? हाच प्रश्न मुंबईच्या फॅन्सना पडला असेल.

मुंबईला मिळाला नवीन पोलार्ड

मुंबईच्या पहिल्या दोन विजयात टिम डेविडच महत्त्वाचं योगदान आहे. कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्सचा फिनिशर समजला जातो. पण तो आता रिटायर झाला आहे. टिम डेविडच्या रुपात पोलार्डची जागा घेईल, असा नवीन पोलार्ड मुंबई इंडियन्सला मिळाला आहे. आजच्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा (48) आणि इशान किशनने (43) चांगली फलंदाजी केली. रोहितच अर्धशतक थोडक्यात हुकलं. चाहते त्याच्या पहिल्या हाफ सेंच्युरीची वाट पाहत होते.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....