Johnson vs Warner: वॉर्नर आणि जॉनसन वादला आणखी एक फोडणी! पर्सनल मेसेजबाबत मिचेलने केला आणखी एक खुलासा

मिचेल जॉनसन आणि डेविड वॉर्नर यांच्या वादाने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. जॉनसच्या कॉलमनंतर आता वाद शमण्याऐवजी वाढतच चालला आहे. काही खेळाडू वॉर्नरच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. असं असताना माजी गोलंदाज मिचेल जॉनसेन याने डेविड वॉर्नरवरील वादग्रस्त विधानामाचं खरं कारण सांगितलं आहे.

Johnson vs Warner:  वॉर्नर आणि जॉनसन वादला आणखी एक फोडणी! पर्सनल मेसेजबाबत मिचेलने केला आणखी एक खुलासा
Johnson vs Warner: वॉर्नर आणि जॉनसन वादाची नेमकी ठिणगी कुठे पडली? आता मिचेलने सांगितलं काय झालं ते
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 5:16 PM

मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या दृष्टीने महत्त्वाची आहे. असं असताना ही मालिका डेविड वॉर्नरच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट आहे. डेविड वॉर्नर यानंतर कसोटीतून निवृत्ती घेणार आहे. दुसरीकडे, मिचेल जॉनसन याच्या वक्तव्याने नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. माजी गोलंदाज मिचेल जॉनसेन याने डेविड वॉर्नरच्या निवृत्ती कसोटीवर टीका केली आहे. ज्या क्रिकेटपटूच्या बॉल टॅम्परिंगमुळे संपूर्ण संघाचं नाव खराब झालं. त्या क्रिकेटपटूला कसोटीत निवृत्ती देताना इतकं सर्व आयोजन करणं चुकीचं आहे. मिचेल जॉनसनच्या टीकेनंतर आजी माजी खेळाडूंनी मिचेलवर टीकास्त्र सोडलं आहे. उस्मान ख्वाजाने मिचेल जॉनसनला खडे बोल सुनावले आहेत. आता पुन्हा एकदा मिचेल जॉनसनने या वादाचं आणखी एक कारण सांगून टाकलं आहे. त्यामुळे हा वाद लवकर शमेल असं दिसत नाही.

मिचेल जॉनसन याने द क्रिकेट शोच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, “वॉर्नरने मला एक मेसेज केला होता. हा मेसेज खूपच वैयक्तिक होता. त्यानंतर मी त्याला फोनही केला होता. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न मी कायम करत असतो. जर तु्म्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास असेल तर एकत्रितपणे चर्चा करून दूर करू शकता. या वेळेपर्यंत मी कधीही पर्सनल बोललो नव्हतो. त्यामुळेच मला कॉलम लिहिण्यास प्रवृत्त केलं गेलं. हा त्याचा एक भाग आहे. हे नक्कीच एक कारण होतं.”, असं मिचेल जॉनसन याने सांगितलं.

“मेसेजमध्ये काय होतं मी मी नाही सांगणार. पण डेविड याबाबत बोलू इच्छित असेल तर ते त्याच्यावर अवलंबून आहे. त्यात काही अशा बाबी होत्या त्या निराशाजनक होत्या. त्याने जे काय लिहिलं होतं ते खूपच वाईट होतं हे मी प्रामाणिकपणे सांगतो.”, असं मिचेल जॉनसन याने सांगितलं. पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेत डेविड वॉर्नरला स्थान मिळाल्याने मिचेल जॉनसनने निवड समितीवर टीका केली आहे. इतकंच काय तर डेविड वॉर्नरचा मागच्या 36 डावातील सरासरी 26 आहे.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.