Mithali Raj Retirement: त्यावेळी मिताली राजने थेट कोच रमेश पोवार यांच्याशी घेतला होता पंगा

Mithali Raj Retirement: मिताली राज सर्वाधिक दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. 23 वर्षाच्या एवढ्या मोठ्या प्रदीर्घ कारकीर्दीत फार कमी वेळा तिचा वादांशी सामना झाला.

Mithali Raj Retirement: त्यावेळी मिताली राजने थेट कोच रमेश पोवार यांच्याशी घेतला होता पंगा
Mithali Raj Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 3:50 PM

मुंबई: भारताच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Mithali Raj Retirement) स्वीकारली आहे. 1999 साली डेब्यु करणाऱ्या मितालीने 23 वर्ष भारताचं प्रतिनिधीत्व केलं. मितालीने महिला क्रिकेटमध्ये (Womens Cricket) अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. भारतीय महिला संघ अडचणीत सापडायचा, तेव्हा मिताली खेळपट्टीवर टीकून रहायची. सहजासहजी प्रतिस्पर्ध्यांना विकेट बहाल केला नाही. एवढ्या मोठ्या करीयरमध्ये अनेक वादही तिच्यासोबत जोडले गेले. एकदा, तर टीम सिलेक्शनवरुन (Team selection) तिने थेट कोचशी वाद घातला होता. मार्च महिन्यात झालेली महिला वर्ल्ड कप स्पर्धा ही मितालीची शेवटची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे. क्राइस्टचर्च येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ती शेवटचा सामना खेळली होती. कॅप्टन म्हणून मिताली राजची ही शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती.

हा सर्वात मोठा वाद ठरला

मिताली राज सर्वाधिक दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. 23 वर्षाच्या एवढ्या मोठ्या प्रदीर्घ कारकीर्दीत फार कमी वेळा तिचा वादांशी सामना झाला. कोच बरोबर झालेले मतभेद हा सर्वात मोठा वाद आहे. तिने तत्कालिन कोचवर अपमानित केल्याचा आरोप केला होता.

सेमी फायनल मॅचमध्येच केलं संघाबाहेर

चार वर्षापूर्वी कोच रमेश पोवार यांच्याबरोबर झालेला तिचा वाद मीडियामध्ये बराच गाजला. टी 20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध प्लेइंग 11 मध्ये तिला संघात स्थान दिलं नव्हतं. त्यावरुन वाद झाला होता. स्पर्धेत 2 अर्धशतकं झळकावणाऱ्या मितालीला कोच रमेश पोवार यांनी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात बाहेर बसवलं होतं. वर्ल्ड कपचा तो सेमीफायनलचा सामना होता. भारतीय महिला संघाचा या सामन्यात पराभव झाला होता.

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.