WPL Mumbai Indians Team 2023: मुंबईच्या टीममध्ये कुठले खेळाडू? जाणून घ्या पूर्ण लिस्ट
WPL Mumbai Indians Team 2023: मुंबई फ्रेंचायजीने टीम विकत घेतली आहे. सोमवारी लिलाव झाला. त्यावेळी मुंबई इंडियन्सने चांगली टीम उभारण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने विकत घेतलय.
WPL Mumbai Indians Team 2023: मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. या टीमने पाचवेळा आयपीएलच जेतेपद पटकावलं आहे. आता मुंबईच्या फ्रेंचायजीने महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) पाऊल ठेवलय. यंदा पहिल्यांदाच WPL आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई फ्रेंचायजीने टीम विकत घेतली आहे. सोमवारी लिलाव झाला. त्यावेळी मुंबई इंडियन्सने चांगली टीम उभारण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने विकत घेतलय. त्याशिवाय अनेक मोठी नावं या टीममध्ये आहेत. एकूण 17 प्लेयर्सना मुंबई इंडियन्सने विकत घेतलय.
कुठल्या दोन टीम्सनी खर्च केले सर्व पैसे ?
या टीमने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये चार्लोट एड्वर्ड्स यांची नियुक्ती केलीय. त्याशिवाय भारताची सर्वात यशस्वी गोलंदाज झुलन गोस्वामीला सुद्धा बॉलिंग कोच म्हणून टीमसोबत जोडलय. लिलावाच्या दिवशी टीमच्या मालक नीता अंबानी या सुद्धा लिलाव प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या दोन टीम्सनी खेळाडूंवर सर्व पैसे खर्च केले. अन्य टीम्सच्या पर्समध्ये काही रक्कम बाकी आहे.
Presenting you the ℂ???? ?? ????! ?
What do you think about our Fa-??-ly, Paltan? ?#OneFamily #MumbaiIndians #AaliRe #WPLAuction pic.twitter.com/nPGG6BlDxI
— Mumbai Indians (@mipaltan) February 13, 2023
गोलंदाजी कोच झुलन मुंबई इंडियन्सच्या टीमवर काय म्हणाली?
मुंबई इंडियन्सने खूप चांगली टीम निवडलीय असं मुंबई इंडियन्सची गोलंदाजी कोच झुलन गोस्वामीने सांगितलं. टीममध्ये सीनियर आणि ज्यूनियर प्लेयर्सच चांगलं मिश्रण असल्याच झुलनने सांगितलं. “आमची टीम संतुलित आहे. टीममध्ये सीनियर आणि ज्यूनियर खेळाडूंच चांगलं मिश्रण आहे. टीम म्हणून आम्हाला चांगला परफॉर्मन्स करायचा आहे. टीम स्पोर्ट व्यक्तीगत प्रदर्शनाच्या आधारावर जिंकता येत नाही” असं झुलन म्हणाली.
WPL साठी मुंबई इंडियन्सची टीम
1 हरमनप्रीत कौर- 1.80 कोटी रुपये
2 यास्तिका भाटिया- 1.50 कोटी रुपये
3 पूजा वस्त्राकर- 1.90 कोटी रुपये
4 एमेली केर- 1 कोटी रुपये
5 नेट सिवर- 3.20 कोटी
6 धारा गुज्जर- 10 लाख
7 साइका इशाक- 10 लाख
8 अमनजोत कौर -50 लाख
9 इसी वॉंग- 30 लाख
10 हीथर ग्राहम -30 लाख
11 हेली मैथ्यूज – 40 लाख
12 शोले ट्रायन- 30 लाख
13 हुमैरा काजी- 10 लाख
14 प्रियंका बाला- 20 लाख
15 सोनम यादव- 10 लाख
16 नीलम बिष्ट-10 लाख
17 जिनटीमानी कालिटा-10 लाख