मोईन अलीसाठी चेन्नईची तिजोरी खाली, इंग्लिश खेळाडूसाठी मोजले इतके कोटी

Moeen Ali sold to CSK इंग्लिश अष्टपैलू खेळाडू मोईन अलीसाठी चेन्नई सुपर किंग्जने तब्बल 7 कोटी रुपये मोजले आहेत.

मोईन अलीसाठी चेन्नईची तिजोरी खाली, इंग्लिश खेळाडूसाठी मोजले इतके कोटी
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 4:20 PM

Moeen Ali bid ipl auction चेन्नई : आयपीएल लिलावात अनेक खेळाडू कोट्यवधींची उड्डाणं घेत आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबने (KXIP) संघातून मुक्त केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलवर (Glenn Maxwell) तगडी बोली लागली. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. अखेर विराट कोहलीच्या बंगळुरुने तब्बल 14.25 कोटींची बोली लावून, ग्लेन मॅक्स्वेलला आपल्या ताफ्यात घेतलं. कोट्यवधींच्या बोली एवढ्यावरच थांबल्या नाहीत इंग्लंड संघातील अष्टपैलू खेळाडू मोईन अलीसाठीदेखील आजच्या लिलावात मोठी बोली लागली. (Moeen Ali sold to CSK in IPL Auction 2021 live, price team bid)

मोईन अलीसाठी अनेक संघांनी बोली लावली. त्यातही प्रामुख्याने अभिनेत्री प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये मोईन अलीसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. ही स्पर्धा चेन्नई सुपरकिंग्सने जिंकली. तब्बल 7 कोटी रुपयांची बोली लावून चेन्नई सुपरकिंग्सने मोईन अलीला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं आहे. मोईन अलीची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. त्याच्यावर पंजाब किंग्स आणि चेन्नईने मोठमोठी बोली लावल्याचे पाहायला मिळाली. अखेर चेन्नईने 7 कोटी रुपयांमध्ये मोईन अलीला त्यांच्या ताफ्यात सामावून घेतलं.

दुसऱ्या बाजूला मॅक्सवेलची बेस प्राईज 2 कोटी इतकी होती. मात्र चेन्नई आणि बंगळुरुने मॅक्सवेलला आपल्या संघात घेण्यात मोठी बोली लावली. त्यातच कोलकातानेही उडी घेत, मॅक्सवेलला आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न केला. चेन्नईने 6 कोटीपर्यंत बोली लावत लावत पुढे गेले. मात्र बंगळुरुने पेटारा उघडून तब्बल 14.25 कोटी रुपयांत मॅक्स्वेलला आपल्या संघात घेतलं.

मुंबईनंतर आयपीएलमध्ये चेन्नई ही सर्वात यशस्वी टीम आहे. मात्र चेन्नईसाठी आयपीएलचा 13 वा मोसम खराब ठरला. त्यामुळे या 14 व्या मोसमात दमदार कामगिरी करण्याचा मानस चेन्नईचा असणार आहे. चेन्नईकडे 7 परदेशी खेळाडूंसह एकूण 19 खेळाडू आहेत. चेन्नईला आणखी 6 प्लेअर्सची आवश्यकता आहे. चेन्नईकडे 19 कोटी 90 लाख इतकी रक्कम आहे. त्यापैकी 7 कोटी रुपये खर्च करुन त्यांनी आता मोईन अलीला त्यांच्या ताफ्यात सामावून घेतलं आहे.

चेन्नईची टीम : एमएस धोनी (कॅप्टन), सुरेश रैना, अंबाती रायडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सॅम करन, जोश हेजलवुड, आर साई किशोर, रॉबिन उथप्पा, मोईन अली

हेही वाचा

IPL Auction 2021 Live | ख्रिस मॉरिस ठरला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू

विराट कोहलीच्या बंगळुरुने पेटारा उघडला, ग्लेन मॅक्स्वेलसाठी मोजले 14,25,00,000 रुपये

(Moeen Ali sold to CSK in IPL Auction 2021 live, price team bid)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.