Mohammed Shami on Trolling: ‘ते खरे भारतीय नाहीत’, धर्मावरुन ट्रोलिंग करणाऱ्यांना मोहम्मद शमीचं सडेतोड उत्तर

Mohammed Shami on Trolling: मागच्यावर्षी T 20 वर्ल्डकपमध्ये ( T 20 World cup) पाकिस्तानकडून (India vs Pakistan) पराभव झाल्यानंतर मोहम्मद शमीला (Mohammed Shami) सोशल मीडियावर काही जणांनी ट्रोल केलं होंत.

Mohammed Shami on Trolling: 'ते खरे भारतीय नाहीत', धर्मावरुन ट्रोलिंग करणाऱ्यांना मोहम्मद शमीचं सडेतोड उत्तर
वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघ परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभूत झाला. टी-20 च्या या सामन्यानंतर सोशल मीडियावर मोहम्मद शमीला लक्ष्य करण्यात आलं. त्याला त्याच्या धर्मावरुन लोकांनी लक्ष्य केलं. शमीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याला गद्दार ठरवणारे शेकडो मेसेजस पाठवण्यात आले. भारतीय संघाबाहेर तुला काढलं पाहिजे, अशी ट्रोलर्सची मागणी होती.
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 2:35 PM

नवी दिल्ली: मागच्यावर्षी T 20 वर्ल्डकपमध्ये ( T 20 World cup) पाकिस्तानकडून (India vs Pakistan) पराभव झाल्यानंतर मोहम्मद शमीला (Mohammed Shami) सोशल मीडियावर काही जणांनी ट्रोल केलं होंत. मोहम्मद शमीला त्याच्या धर्माशी जोडून खालच्या पातळीच्या कमेंटस केल्या होत्या. त्या वादावर मोहम्मद शमी आता व्यक्त झाला आहे. मोहम्मद शमीने धर्मावरुन ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे. “अशा प्रकारची ट्रोलिंग करणारे खरे भारतीय असू शकत नाहीत तसेच ते क्रिकेटचे खरे चाहेत सुद्धा नाहीत” असं शमीने म्हटलं आहे. मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच भारतावर विजय मिळवला. पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारताचा मोठा पराभव केला होता. त्यामुळे क्रिकेट चाहते नाराज झाले होते. काही जणांनी या पराभवासाठी मोहम्मद शमीला जबाबदार धरुन त्याला धर्मावरुन जबरदस्त ट्रोल केलं होतं.

सामना हरण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता

भारताच्या त्या पराभवानंतर सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्या मेसेजेसचा पूर आला होता. मोहम्मद शमीच्या पर्सनल इन्स्टाग्राम अकाऊंटवरही अनेकांनी ट्रोलिंगचे हे मेसेजेस केले होते. त्याला गद्दार ठरवलं होतं. सामना हरण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. “ज्यांनी ट्रोलिंग केलं, ते खरे भारतीयही नाहीत आणि क्रिकेटचे चाहतेही नाहीत” असं मोहम्मद शमीने सोमवारी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

भारताबद्दलची एकनिष्ठता सिद्ध करण्याची गरज नाही

“कुठलाही ठावठिकाणा नसलेल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरुन जेव्हा तुम्हाला टार्गेट केलं जातं, तेव्हा ट्रोलिंग करणाऱ्याकडे गमावण्यासारखं काही नसतं” असं शमी म्हणाला. “ट्रोलिंग करणाऱ्यांच अस्तित्वच नसल्यामुळे त्यांच्याकडे गमावण्यासारखं काही नसतं. पण म्हणून त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. भारताबद्दल माझ्या मनात असलेली एकनिष्ठता मला कोणालाही सिद्ध करुन दाखवण्याची गरज नाही” असं शमीने मुलाखतीत सांगितलं.

काही सिद्ध करण्याची गरज नाही

“आम्ही काय आहोत, हे आम्हाला माहित आहे. भारत आमच्यासाठी काय आहे, हे आम्हाला कोणाला सांगण्याची गरज नाही. कारण आम्ही भारताचं प्रतिनिधीत्व करतो आणि देशासाठी लढतो” असं शमी म्हणाला. अशा ट्रोलिंगवर काही बोलून किंवा व्यक्त होऊन आम्हाला काही सिद्ध करण्याची गरज नाही” असं शमी म्हणाला. 2013 मध्ये पदार्पण करणाऱ्या मोहम्मद शमीने 57 कसोटी सामन्यात 209 विकेट घेतल्या आहेत.

Mohammed Shami Opens Up On Being Targetted By Trolls After India’s Defeat To Pakistan In 2021 T20 World Cup

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.