Mohammed Siraj चा मोठा रेकॉर्ड, जसप्रीत बुमराह-शाहीन शाह आफ्रिदी जवळपासही नाही

Mohammed Siraj - मोहम्मद सिराज टिच्चून मारा करतोय. पहिल्या दोन वनडेत टीमच्या विजयात त्याने महत्त्वाच योगदान दिलय. दुसऱ्या वनडे मॅचमध्ये त्याने आपल्या बॉलिंगने सर्वांचच मन जिंकलं.

Mohammed Siraj चा मोठा रेकॉर्ड, जसप्रीत बुमराह-शाहीन शाह आफ्रिदी जवळपासही नाही
गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये मोहम्मद सिराजने नंबर वन होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केलीय. श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये तो सर्वाधिक 9 विकेट घेणारा गोलंदाज आहे. ट्रेंट बोल्ट आणि जॉस हेजलवुड आता तिसऱ्या स्थानावर आहेत.
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 12:06 PM

Mohammed Siraj Record – मोहम्मद सिराज मागच्या काही महिन्यांपासून जबरदस्त प्रदर्शन करतोय. त्याने बॅट्समनवर स्वत:ची एक दहशत निर्माण केलीय. श्रीलंकेनंतर न्यूझीलंड विरुद्ध त्याची तशीच धमाकेदार कामगिरी सुरु आहे. मोहम्मद सिराज टिच्चून मारा करतोय. पहिल्या दोन वनडेत टीमच्या विजयात त्याने महत्त्वाच योगदान दिलय. दुसऱ्या वनडे मॅचमध्ये त्याने आपल्या बॉलिंगने सर्वांचच मन जिंकलं. दुसऱ्या वनडेत मोहम्मद सिराजने एक मेडन ओव्हर टाकून एक रेकॉर्ड केला. त्याने क्रिकेट विश्वातील मोठ्या-मोठ्या गोलंदाजांना मागे टाकलं. त्याच्या रेकॉर्डबद्दल जाणून घेऊया.

सिराजची कमाल

मोहम्मद सिराजने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे मॅचमध्ये चार विकेट काढल्या. दुसऱ्या वनडे मॅचमध्ये सुद्धा त्याने तुफानी गोलंदाजी केली. त्याने 6 ओव्हरमध्ये 10 रन्स देऊन 1 विकेट काढला. या मॅचमध्ये एक ओव्हर त्याने मेडन टाकली. सिराज वर्ष 2022 पासून आतापर्यंत सर्वाधिक मेडन ओव्हर टाकणार गोलंदाज बनलाय.

हे सुद्धा वाचा

मोहम्मद सिराजनंतर पुढचे दोघे कोण?

मोहम्मद सिराजने वर्ष 2022 पासून आतापर्यंत 17 मेडन ओव्हर टाकल्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड दुसऱ्या नंबरवर आहे. त्याने 14 मेडन ओव्हर टाकल्यात. 10 मेडन ओव्हर टाकणारा ट्रेंट बोल्ट तिसऱ्या नंबरवर आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

मोहम्मद सिराजने श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहची कमतरता जाणवू दिली नाही. सिराज वर्ष 2022 मध्ये भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. तो टीम इंडियाकडून आतापर्यंत तिन्ही फॉर्मेटमध्ये क्रिकेट खेळलाय. भारताकडून 21 वनडे मॅचमध्ये 38 विकेट घेतलेत. सिराजच्या गोलंदाजीची खासियत काय?

मोहम्मद सिराज डावाच्या सुरुवातीला कमालीची गोलंदाजी करतो. विकेट काढण्याबरोबर किफायती गोलंदाजी हे त्याच वैशिष्ट्य आहे. रोहित शर्माला विकेटची गरज असताना तो मोहम्मद सिराजच्या हाती चेंडू सोपवतो. मोहम्मद सिराज वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतो. त्यामुळे बॅट्समनला मुक्तपणे त्याच्या बॉलिंगवर फटकेबाजी करता येत नाही.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.