IND vs ENG : इंग्लंडच्या प्रेक्षकांनी स्कोर विचारत सिराजला चिडवलं, सिराजनेही चोख प्रत्युत्तर देत केलं शांत, पाहा नेमकं काय घडलं?

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ 78 धावांवर सर्वबाद झाला असून गोलंदाजीतही इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी भागिदारी केल्यानंतरही भारताला एकही विकेट घेता आलेला नाही. त्यामुळे इंग्लंडचे समर्थक कमालीचे आनंदी असून त्यांनी भारतीय खेळाडूंना डिवचण्यास सुरुवात केली आहे.

IND vs ENG : इंग्लंडच्या प्रेक्षकांनी स्कोर विचारत सिराजला चिडवलं, सिराजनेही चोख प्रत्युत्तर देत केलं शांत, पाहा नेमकं काय घडलं?
मोहम्मद सिराज
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 1:54 PM

लंडन : भारतीय युवा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या स्लेजिंगला (चिडवणे) सामोरं जावं लागलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यालक वर्णभेदी टीकनंतर आता इंग्लंड येथे तिसऱ्या कसोटीतही इंग्लंडच्या समर्थकांनी त्याला डिवचत चिडवण्याचा प्रयत्न केला. ऋषभ पंतने (Rishabh Pant) पहिल्या दिवशीच्या खेळानंतर मीडियाशी बोलताना याबाबतचा खुलासा केला. त्याने सांगितलं ‘जेव्हा सिराज बाउंड्री जवळ फिल्डिंग करत होता तेव्हा ही घटना घडली. सिराजवर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी काही तरी फेकलं. कोहलीलाही याबाबत कळता त्याने पुन्हा ती गोष्ट त्यांच्याकडे फेकण्यास सिराजला सांगितलं.’ हे सलग दुसऱ्यांदा असं भारतीय खेळाडूंसोबत घडलं होतं. लॉर्ड्स कसोटीत केएल राहुलसोबत अशी घटना घडली होती.

पण यावेळेस इंग्लंडचे फॅन यावरच न थांबता त्यांनी सिराजवर टीका करण्यास सुरुवात केली त्याला चिडवत त्यांनी कुत्सितपणे स्कोर किती झाला असं विचारलं. ज्यावर सिराजने देखील दमदार प्रत्युत्तर देत इशाऱ्यांमध्ये 1-0 असं सांगितलं. याचा अर्थ भारताने मालिकेत एक विजय मिळवला असून इंग्लंडने अजूनपर्यंत एकही विजय मिळवलेला नाही. सिराजच्या या इशाऱ्याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

तिसऱ्या कसोटीचा आतापर्यंतचा लेखाजोखा

भारतीय संघासाठी तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस अतिशय खराब ठरला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार विराट कोहली याचा हाच निर्णय चुकीचा ठरताना दिसला. कारण प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांची सुरुवातच खराब झाली. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या 78 धावांवर तंबूत परतले. भारतीय संघाकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 19 धावा केल्या.  इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग आव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडने सलामीवीर रॉरी बन्र्स आणि हसीब हमीद यांच्या संयमी सुरुवातीने एक चांगली आघाडी घेतली आहे. दोघांनी अर्धशतक  केलं असून रॉरीने 125 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. तर हमीदने नाबाद 60 धावा केल्या आहेत. टीम इंडियाच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आलेलं नाही. तर इंग्लंडच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत 42 षटकांत 120 धावा झाल्या आहेत.

हे ही वाचा

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत विराटचं अनोखं ‘अर्धशतक’, चाहत्यांसह स्वत: विराटही निराश

IND vs ENG : भारतीय संघाच्या पाठी लागला ‘हा’ इंग्रज, तिसऱ्या कसोटीत पराभव निश्चित? ‘हे’ आहे कारण

IND vs ENG : जो रुट आणि विराट कोहलीमध्ये मैदानाबाहेरही झाला होता वाद, समोर आली खळबळजनक माहिती

(Mohammed Siraj Perfect Reply to England Fans asking him score while sledging in third test at leeds)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.