MPL 2023 CSK vs PB | Ruturaj Gaikwad च्या पुणेरी बाप्पाचा सलग दुसरा विजय, CSK ला चारली धूळ

MPL 2023 CSK vs PB | पुण्याच्या विजयात ऋतुराज नाही, दुसराच खेळाडू चमकला. एमएस धोनीचा सहकारी पुन्हा फेल. पुणेरी बाप्पाचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. महाराष्ट्रातील स्थानिक खेळाडू या स्पर्धेमध्ये चमकत आहेत.

MPL 2023 CSK vs PB | Ruturaj Gaikwad च्या पुणेरी बाप्पाचा सलग दुसरा विजय, CSK ला चारली धूळ
mpl 2023 puneri bappa ruturaj gaikwad
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 8:06 AM

पुणे : सध्या महाराष्ट्र प्रीमियर लीगचा हंगाम सुरु आहे. IPL च्या धर्तीवर महाराष्ट्रातील क्रिकेटर्ससाठी MPL 2023 स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. गुरुवारपासून MPL 2023 स्पर्धा सुरु झालीय. महाराष्ट्रातील स्थानिक क्रिकेटर्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपली चमक दाखवतायत. काल कोल्हापूर टस्कर्स आणि रत्नागिरी जेट्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये औरंगाबाद पैठणच्या अंकित बावनेने तडाखेबंद शतक ठोकलं. MPL 2023 स्पर्धेतील ही पहिली सेंच्युरी आहे.

महाराष्ट्र प्रीमियर लीगच वैशिष्ट्य म्हणजे टीम इंडियाकडून खेळलेले महाराष्ट्रातील दिग्गज क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळतायत. त्यामुळे या स्पर्धेची रंगत वाढलीय. MPL मध्ये सहा टीम्स असून लीग स्टेजमध्ये 19 सामने खेळवले जाणार आहेत.

पुणेरी बाप्पा विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स

हे सुद्धा वाचा

रविवारी डबल हेडर सामने झाले. दिवसातील दुसरा सामना पुणेरी बाप्पा आणि छत्रपती संभाजी किंग्समध्ये झाला. या मॅचमध्ये सगळ्यांच्या नजरा ऋतुराज गायकवाडवर होत्या. त्याच्या नेतृत्वाखाली पुणेरी बाप्पाने छत्रपती संभाजी किंग्सवर सलग दुसरा विजय मिळवला. पुणेरी बाप्पाने आरामात 7 विकेटने विजय मिळवला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर हे सामने सुरु आहेत.

CSK कडून कोणी चांगली बॅटिंग केली?

पहिल्या सामन्यात पुणेरी बाप्पाने केदार जाधवच्या कोल्हापूर टस्कर्सवर 8 विकेट्स विजय मिळवला होता. रविवारच्या दुसऱ्या सामन्याच छत्रपती संभाजी किंग्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 146 धावा केल्या. CSK कडून ओम भोसलेने 33 चेंडूत सर्वाधिक 46 धावा केल्या. यात 5 फोर, 1 सिक्स आहे. ओपनर सौरभ नवाळेने 23 चेंडूत 31 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त अन्य फलंदाज चमक दाखवू शकले नाहीत. ऋतुराजऐवजी दुसरा खेळाडू चमकला

CSK च्या लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या पुणेरी बाप्पाने आरामात धावसंख्या चेस केली. ओपनिंगला येणारा ऋतुराज गायकवाड खाली फलंदाजीसाठी आला. पुण्याकडून पवन शाहने फटकेबाजी केली. त्याने 32 चेंडूत 54 धावा तडकावल्या. यात 6 फोर, 2 सिक्स होते. ऋतुराज गायकवाडने 18 चेंडूत नाबाद 29 धावा केल्या. यात 1 फोर, 2 सिक्स होते. त्याने आणि अद्वय शिधयेने पुण्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यांनी 16.2 ओव्हर्समध्ये 147 धावांच टार्गेट गाठलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.