MS Dhoni एका महिन्यापासून त्रस्त, 40 रुपये घेणाऱ्या वैद्याकडून उपचार, जाणून घ्या प्रकरण?
IPL 2022 नंतर एमएस धोनी (MS Dhoni) आपल्या स्वत:च्या शहरात रांची मध्ये आहे. तिथे असताना धोनी एका सामान्य माणसाप्रमाणे राहतो. मित्रांना भेटणं, त्यांच्या पार्ट्यांमध्ये सहभागी होणं, शेती काम यामध्ये धोनी व्यस्त असतो.
मुंबई: IPL 2022 नंतर एमएस धोनी (MS Dhoni) आपल्या स्वत:च्या शहरात रांची मध्ये आहे. तिथे असताना धोनी एका सामान्य माणसाप्रमाणे राहतो. मित्रांना भेटणं, त्यांच्या पार्ट्यांमध्ये सहभागी होणं, शेती काम यामध्ये धोनी व्यस्त असतो. अलीकडेच एमएस धोनी आपल्या मित्राच्या बर्थ डे पार्टीमध्ये सहभागी झाला होता. त्याचे फोटोही व्हायरल झाले. आता धोनी त्याच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. मागच्या एक महिन्यापासून धोनी या आजाराने त्रस्त आहे. धोनीचा हा आजार गुडघे दुखापतीशी संबंधित आहे. धोनी स्वत: कोट्यधीश आहे. खरंतर तो एखाद्या मोठ्या डॉक्टरकडून, (Doctor) रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकतो. पण धोनी एका साध्या वैद्याकडून त्याच्या आजारावर उपचार घेतोय.
कुठे सुरु आहेत उपचार
धोनी आपल्या गुडघे दुखापतीवर उपचार घेण्यासाठी दर चार दिवसात एकदा या वैद्याकडे जातो. फी म्हणून धोनीला उपचारासाठी फक्त 40 रुपये द्यावे लागतात. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. धोनी रांची पासून 70 किमी अंतरावरील लापुंगच्या बाबा गलगली धाम मध्ये बसणाऱ्या वैद्य वंदन सिंह खेरवार यांच्याकडे उपचारासाठी जातो. धोनी मागच्या महिन्याभरात दर चार दिवसांनी एकदा इथे येतो, असं वंदन सिंह खेरवार यांनी सांगितलं.
साध्या वैद्याची निवड
धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्त झाला आहे. पण आयपीएल मध्ये तो अजूनही सक्रीय आहे. IPL 2023 आधी धोनीला गुडघे दुखीमधून बरं व्हायचं आहे. त्यासाठी धोनीने एका साध्या वैद्याची निवड केलीय. धोनीकडे चेन्नई सुपर किंग्सच कर्णधारपद आहे.
चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा विचार
धोनी प्रोड्यूसर बनण्याची तयारी करतोय. दक्षिणेचा सुपरस्टार थालपथी विजयला घेऊन तो चित्रपट बनवणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करतोय. कॉलीवुड मध्ये तो प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार धोनी या चित्रपटात रोलही करु शकतो. धोनीने स्वत: साऊथ सुपरस्टारला फोन करुन हा चित्रपट करण्याची विनंती केली आहे. थालापथी विजयने सुद्धा ही ऑफर स्वीकारल्याची माहिती आहे. धोनी स्वत:चा प्रोडक्शन हाऊस सुरु करण्याच्या विचारात आहे.