IPL 2021 पूर्वीच धोनीने उडवले उंच षटकार, मग स्वत:च गेला झाडात चेंडू शोधायला, पाहा मजेशीर VIDEO

उर्वरीतआयपीएल स्पर्धा युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या तगड्या संघात आहे. त्यामुळे चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी देखील कसून सराव करत आहे.

IPL 2021 पूर्वीच धोनीने उडवले उंच षटकार, मग स्वत:च गेला झाडात चेंडू शोधायला, पाहा मजेशीर VIDEO
एमएस धोनी
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 12:20 PM

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन एस एस धोनीला (MS Dhoni) एक वर्ष झालं. पण वर्षभरानंतरही त्याच्या चाहत्यांमध्ये कमी आली नसून आजही धोनीला मैदानात खेळताना पाहण्यासाठी चाहते अक्षरश: आतुर असतात. धोनी फॅन्सना लवकरच धोनीचा जलवा मैदानावर पाहायला मिळणार असून युएईमध्ये होणाऱ्या उर्वरीत आयपीएल 2021 (IPL 2021)  सामन्या धोनी खेळताना दिसेल. या सामन्यांसाठी धोनी कसून सराव करत आहे. धोनी सरावादरम्यान मोठ मोठे शॉट्स खेळत असून नंतर बॉल शोधण्यासाठी इतर खेळाडूंसोबत मिळून झाडांमध्ये देखील जात आहे. हा सर्व मजेशीर व्हिडीओ चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Superkings) त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार एमएस धोनी संघातील इतर खेळाडूंसोबत सर्वात आधी युएईला पोहचला आहे. इतर संघाच्या तुलनेत सर्वात आधी युएईत पोहचून विलगीकरणाचा कालावधी चेन्नईच्या खेळाडूंनी संपवला आहे. त्यानंतर आता संघातील सर्व खेळाडू सराव करत आहेत. यावेळी नेटमध्ये फलंदाजी करताना धोनी हेलिकॉप्टर शॉटसह इतर अफलातून शॉट खेळताना पाहायला मिळत आहे. सीएके सराव करत असलेल्या मैदानात आसपास काही झाडं झुडपं असल्याने रात्रीच्या वेळीच्या सरावात नेटच्या बाहेर गेलेला चेंडू शोधण्यासाठी धोनीसह इतर खेळाडूंना मेहनत घ्यावी लागत आहे. हे सर्वच या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस

धोनीच्या या व्हिडीओवर त्याचे चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने तर कमेंटमध्ये ‘माही मार रहा है।’ असं लिहित एमएस धोनी चित्रपटाची आठवण करुन दिली आहे. तर काहींनी माही लेजेंड ऑफ क्रिकेट अशी पदवी देत माहीचं कौतुक केलं आहे.

हे ही वाचा

PHOTO : IPL 2021 मध्ये 5 धाकड खेळाडूंची एन्ट्री, मनोरंजनात्मक गोलंदाजीसह फलंदाजीची रसिकांना पर्वणी

आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाला ‘हे’ धुरंदर खेळाडू मुकणार, प्रत्येकाची कारणं वेगळी

(MS Dhoni hitting sixes and searchin ball in trees at practice session video posted by CSK)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.