MS Dhoni : कलेनं जिंकलं मन, धोनी पोहचला थेट स्टॉलवर, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ती कोणती पोस्ट आहे जाणून घ्या...
मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आयपीएलचं (IPL 2022) पंधरावं सीजन संपल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) या वेळी प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. धोनी नेहमीच आपल्या वागण्यानं आणि खिळाडूवृत्तीनं चाहत्यांची मने जिंकत आला आहे. मात्र, आता एका कलाकारानं आपल्या कलेनं माहीचं मन जिंकलं आहे. धोनी एका कलाकाराच्या प्रेमात पडला आहे. या कलाकारानं आपल्या कामगिराच्या जोरावर धोनीची मुलगी जीवा हिचं कापडावर पेंटिंग बनवलं आहे आणि विशेष म्हणजे ते त्याला खूप आवडलंय. धोनीला खूश करण्यासाठी किंवा तो आवडतो म्हणून त्याचे अनेक चाहते नेहमी काहीतरी नवीन करत असतात. विशेष म्हणजे फक्त तरुणच नव्हे तर अनेक ज्येष्ठ क्रिकेट चाहते देखील धोनीचे फॅन्स आहेत. मात्र, एका कलाकारानं त्याच्या पेंटिंगच्या माध्यमातून धोनीचं मन जिंकलंय.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये धोनी स्वतः हातात धरून आहे. धोनीनं ही कलाकृती टिपून त्याचा व्हिडीओ बनवला आहे. काही वेळातच हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये धोनी ज्या कपड्यावर कलाकारानं धोनी आणि त्याची मुलगी झिवा धोनीचं चित्र बनवलं आहे ते रंगीत कापड घेऊन उभा असल्याचं दिसत आहे.
राज्यमंत्री दर्शना जरदोश यांचं ट्विट
Mr. Appusamy, a weaver from Chennimalai community, Erode, was running #OneStationOneProduct Handloom stall at Erode. An ardent cricket fan, he designed a cloth artwork with MS Dhoni and his daughter.
As the news reached Dhoni, he personally received the artpiece.@msdhoni pic.twitter.com/S9SgP0dSdU
— Darshana Jardosh (@DarshanaJardosh) June 4, 2022
माहीच्या चेहऱ्यावर आनंद
या फोटोमध्ये धोनीच्या चेहऱ्यावर हसू असून तो खूप आनंदी दिसत आहे. वास्तविक श्री. अप्पुसामी नावाचा विणकर इरोडमध्ये स्वतःचा हातमाग स्टॉल चालवतो. त्यानं एका कापडावर आर्टवर्क करून धोनी आणि त्याच्या मुलीचं पोर्ट्रेट बनवलं आहे. धोनीला ही बातमी कळताच तो वैयक्तिकरित्या घेण्यासाठी त्याच्या स्टॉलवर पोहोचला. धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याने तीनही प्रमुख ICC विजेतेपदे जिंकली आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं 2007 मध्ये T20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. धोनीने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण तो अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे.
सब कुछ माहीसाठी
धोनीला खूश करण्यासाठी किंवा तो आवडतो म्हणून त्याचे अनेक चाहते नेहमी काहीतरी नवीन करत असतात. विशेष म्हणजे फक्त तरुणच नव्हे तर अनेक ज्येष्ठ क्रिकेट चाहते देखील धोनीचे फॅन्स आहेत. मात्र, एका कलाकारानं त्याच्या पेंटिंगच्या माध्यमातून धोनीचं मन जिंकलंय.