MS धोनीवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला मोठा झटका, पाहा नेमकं काय झालं?

MS Dhoni plea : आयपीएस अधिकारी संपत कुमार यांनी एमएस धोनीविरोधात स्पॉट फिक्सिंगचा आरोप केला होता. त्यानंतर धोनीने त्यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा खटला भरला होता. आता कोर्टाने संपत कुमार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

MS धोनीवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला मोठा झटका, पाहा नेमकं काय झालं?
MS dhoni HospitalImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 9:15 PM

मुंबई : एम एस धोनीवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप करणारे आयपीएस अधिकारी संपत कुमार अडचणीत आले आहेत. धोनीने त्यांच्याविरुद्ध 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यावर मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणी घेण्याचं ठरवलं आहे. हायकोर्टाने आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्याविरोधात धोनीच्या याचिकेवर सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. 15 जून रोजी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

2013 मध्ये संपत कुमार हे आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी करत होते. त्यावेळी त्याने धोनीवर टीका करत त्याच्यावर आरोपही केले होते. धोनीने संपतकडून 100 कोटी रुपयांची भरपाईही मागितली आहे. धोनीने आपल्या लेखी निवेदनात फिक्सिंगमध्ये आपले नाव ओढल्याबद्दल आयपीएस अधिकाऱ्याला शिक्षेची विनंती केली.

आयपीएलमधील सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगबद्दल बोलायचे झाले तर त्यामुळे या स्पर्धेवर डाग पडला होता. 2016 आणि 2017 मध्ये चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स या फ्रँचायझींवर बंदी घालण्यात आली होती. दोन संघांच्या जागी गुजरात जायंट्स आणि राइजिंग पुणे सुपर जायंट्स हे दोन नवीन संघ उतरले होते. यामध्ये धोनीकडे पुणे संघाच्या कर्णधारपदाची तर सुरेश रैनाकडे गुजरात संघाच्या कर्णधारपादाची जबाबदारी होती. बंदी उठल्यानंतर चेन्नईने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली शानदार पुनरागमन केलं होतं. 2018 साली सीएसकेने फायनल सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचा पराभव करत कडक कमबॅक केलं होतं.

गेल्या मोसमात 9व्या स्थानावर असलेल्या चेन्नईने या मोसमात जबरदस्त पुनरागमन करत आपले 5वे विजेतेपद पटकावले. चेन्नईने साखळी फेरीत 17 गुणांसह दुसरे स्थान पटकावले. त्यानंतर क्वालिफायर 1 मध्ये टायटन्सचा पराभव करून गुजरातने अंतिम फेरी गाठली आणि अंतिम फेरीत हार्दिक पंड्याच्या गुजरातला पराभूत करून पुन्हा एकदा विजेतेपद पटकावत विक्रम रचला होता.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.