MS Dhoni CSK IPL 2023 : शेवटी धोनीच ‘तो’, जाळ फेकलं, अलगद अडकला पांड्या, काय केलं, ते VIDEO मध्ये पाहा
MS Dhoni CSK IPL 2023 : एमएस धोनीला ग्रेट कॅप्टन का म्हणतात? तो इतरांपेक्षा एक पाऊल कसा पुढे असतो? ते VIDEO पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात धोनीची अप्रतिम कॅप्टनशिप पाहायला मिळाली.
चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सने IPL 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नईने आयपीएल फायनल गाठण्याची ही 10 वी वेळ आहे. चेन्नईच्या यशाच एक मुख्य कारण आहे, कॅप्टन एमएस धोनी. धोनीला खूप शातिर कॅप्टन म्हटलं जातं. तो फलंदाजांना अलगद आपल्या जाळ्यात अडकवतो. धोनीच डोक सुद्धा खूप फास्ट चालतं. त्यामुळेच क्रिकेट विश्वातील महान कॅप्टन्समध्ये त्याची गणना होते. क्वालिफायर-1 च्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात धोनीची अप्रतिम कॅप्टनशिप पाहायला मिळाली.
चेन्नईने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी 7 विकेटवर 172 धावा केल्या. गुजरातकडे एकापेक्षा एक सरस बॅट्समन आहेत. त्यामुळे गुजरात हा सामना आरामात जिंकणार, असच सर्वांना वाटत होतं. पण धोनीची कॅप्टनशिप आणि गोलंदाजांचा योग्य पद्धतीने वापर यामुळे गुजरात टायटन्सला 157 रन्सवर रोखणं शक्य झालं.
पण धोनीने असं होऊ दिलं नाही
173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा पहिला विकेट तिसऱ्या ओव्हरमध्ये गेला. शेवटच्या चेंडूवर ओपनर ऋद्धिमान साहा आऊट झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी आला. पांड्या फॉर्ममध्ये असतो, तेव्हा कुठल्याही गोलंदाजी आक्रमणाची वाट लावू शकतो. पण धोनीने असं होऊ दिलं नाही.
? Dhoni moved a fielder to the off-side a ball prior to Hardik getting dismissed! #GTvCSK #TATAIPL #Qualifier1 #IPLonJioCinema pic.twitter.com/oJow2Vp2rj
— JioCinema (@JioCinema) May 23, 2023
पांड्याला बाद करण्यासाठी धोनीने काय केलं?
पांड्याने पाय रोवण्याआधीच धोनीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. हार्दिक पांड्या सहाव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर आऊट झाला. महीश तीक्ष्णाच्या बॉलिंगवर रवींद्र जाडेजाने त्याची कॅच घेतली. जाडेजाने पॉइंटला ही कॅच पकडली. हार्दिक पांड्या बाद होण्याआधी एमएस धोनीने फिल्डिंगमध्ये बदल केले.
पॉइंटच्या डोक्यावरुन मारण्याचा प्रयत्न
त्याने स्क्वेयर लेगचा फिल्डर काढून कव्हर्सला ठेवला. पांड्या ऑफ स्टम्पच्या सर्कलवरुन मारण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून धोनीने फिल्डिंगमध्ये हा बदल केला. धोनीने ऑफ साइडला फिल्डर आणताच पुढच्याच चेंडूवर पांड्या आऊट झाला. पांड्या आधी कव्हर्सच्या डोक्यावरुन मारण्याचा विचार करत होता. पण तिथे फिल्डर असल्याने त्याने चेंडू पॉइंटच्या डोक्यावरुन मारण्याचा प्रयत्न केला. तिथेच पांड्या अडकला. चेन्नईसाठी हा विजय का खास?
चेन्नईचा हा विजय यासाठी खास आहे, कारण त्यांनी गुजरात सारख्या टीमसमोर 173 धावांचा यशस्वी बचाव केला. गुजरातच्या टीमकडे 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची क्षमता आहे. चेन्नईच्या गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावलं. धोनीने त्यांचा योग्य पद्धतीने वापर केला, त्यामुळे टीमला यश मिळालं.