Sarfaraz Khan -‘अब्बू अर्जुनच नशीब किती…’ सर्फराजच्या वडिलांनी सांगितली ‘ती’ आठवण

Sarfaraz Khan - "एकवेळ सर्फराजला तो सचिन तेंडुलकरचा मुलगा नाहीय, याची खंत वाटली होती. पण लवकरच त्याचा विचार बदलला" सर्फराजचे वडिल नौशाद खान यांनी हे सांगितलं.

Sarfaraz Khan -'अब्बू अर्जुनच नशीब किती...' सर्फराजच्या वडिलांनी सांगितली 'ती' आठवण
Sarfaraz khan-Arjun TendulkarImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 1:47 PM

मुंबई – भारताचा युवा बॅट्समन सर्फराज खान सध्या चर्चेचा विषय बनलाय. सोशल मीडियापासून ते वर्तमानपत्रापर्यंत सध्या सर्फराजवर बरच काही लिहिल जातय. त्याला कारणही तसच आहे. मुंबईच्या या टॅलेंटेड बॅट्समनला दमदार प्रदर्शनानंतरही टीम इंडियात संधी मिळत नाहीय. सिलेक्शन कमिटीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन कसोटी सामन्यासाठी टीम निवडताना त्याचा विचार केला नाही. त्यामुळेच सर्फराजबद्दल एवढ बोललं जातय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त धावा नाही, तर शतकांचा पाऊस पडतोय.

अर्जुन तेंडुलकरला पाहून जळफळाट व्हायचा

सर्फराजला सहजासहजी हे यश मिळत नाहीय. त्याच्यामागे अनेक वर्षांची मेहनत, संघर्ष आहे. मुंबईच्या या बॅट्समनच्या यशामध्ये त्याच्या वडिलांची महत्त्वाची भूमिका आहे. एकवेळ सर्फराजचा अर्जुन तेंडुलकरला पाहून जळफळाट व्हायचा. पण लवकरच त्याला जाणीव झाली. त्याच्याकडे असे वडिल आहेत, जे त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहेत.

हे सुद्धा वाचा

सचिन तेंडुलकरचा मुलगा नाहीय, याची खंत वाटली

सर्फराज आणि अर्जुन तेंडुलकर दोघेही बालपणापासून मुंबईसाठी क्रिकेट खेळले आहेत. “एकवेळ सर्फराजला तो सचिन तेंडुलकरचा मुलगा नाहीय, याची खंत वाटली होती. पण लवकरच त्याचा विचार बदलला” सर्फराजचे वडिल नौशाद खान यांनी हे सांगितलं.

मला मिठी मारली व मला म्हणाला….

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सर्फराज खानचे वडिल नौशाद यांनी आयुष्यातील काही भावनिक क्षण सांगितले. ज्यूनियर स्तरावर सर्फराज अर्जुनसोबत खेळायचा. “एकदिवस तो माझ्याजवळ आला व निरागसतेने बोलला. अब्बु अर्जुन किती नशिबवान आहे. अर्जुन सचिन सरांचा मुलगा आहे. त्याच्याकडे कार, आयपॅड आहे. हे ऐकून मी काहीच बोललो नाही” असं नौशाद यांनी सांगितलं. “हे बोलून गेल्यानंतर सर्फराज पुन्हा काहीवेळाने माझ्याजवळ आला. मला मिठी मारली. मला म्हणाला, अर्जुनपेक्षा मी लकी आहे. माझ्याजवळ तुम्ही आहात. तुम्ही मला पूर्ण दिवस देऊ शकता. अर्जुनचे वडिल त्याच्यासाठी हे करु शकत नाहीत” ही भावनिक आठवण नौशाद यांनी सांगितली. सर्फराजच्या वडिलांची मेहनत

सर्फराजला यशस्वी क्रिकेटर बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी खूप मेहनत केलीय. “दररोज 2500 चेंडू खेळलास, तर वर्षाच्या अखेरीस 1 लाख संख्या होईल” असे ते सर्फराजला सांगायचे. तुझ्याशिवाय दुसरा कोणी हे करु शकत नाही. ते सर्फराजचा सराव घ्यायचे. याच सरावामुळे सर्फराजला मोठ्या इनिंग खेळण्याचा विश्वास मिळाला.

'मराठ्यांचा संयम सुटला तर...',जरांगे पाटलांची सरकारला हात जोडून विनंती
'मराठ्यांचा संयम सुटला तर...',जरांगे पाटलांची सरकारला हात जोडून विनंती.
मुंडे यांचा राजीनामा होणार? अंजली दमानिया उद्या काय करणार गौप्यस्फोट?
मुंडे यांचा राजीनामा होणार? अंजली दमानिया उद्या काय करणार गौप्यस्फोट?.
'मविआ काळात तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको',राणेंचा रोख नेमका कुणावर?
'मविआ काळात तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको',राणेंचा रोख नेमका कुणावर?.
'गरिबांच्या मुलांवर अन्याय मात्र पंचांना...', राक्षेच्या आईचा सवाल
'गरिबांच्या मुलांवर अन्याय मात्र पंचांना...', राक्षेच्या आईचा सवाल.
'सामना'तून अर्थसंकल्पावर टीका, निर्मला सीतारामनांचा 'खडूस' असा उल्लेख
'सामना'तून अर्थसंकल्पावर टीका, निर्मला सीतारामनांचा 'खडूस' असा उल्लेख.
राक्षेनं पंचांना मारली लाथ, महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ
राक्षेनं पंचांना मारली लाथ, महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ.
'माझ्या नादाला लागू नको', जरांगे-भुजबळांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप?
'माझ्या नादाला लागू नको', जरांगे-भुजबळांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप?.
विमानात शिंदेंचा आमदार? राऊतांचा शिंदे अन् शहांबद्दल खळबळजनक दावा काय?
विमानात शिंदेंचा आमदार? राऊतांचा शिंदे अन् शहांबद्दल खळबळजनक दावा काय?.
'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली
'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली.
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'.