Video : मुंबईकडून गुजरातला 178 धावांचं लक्ष्य, डेव्हिडची तुफानी फलंदाजी, रोहित-इशानचं अर्धशतक हुकलं, पाहा Highlights Video
रोहितचं अर्धशतक हुकलं. रोहित 28 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 43 धावा करून बाद झाला.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सामन्यात आज सुरु असलेल्या गुजरात विरुद्धच्या (GT) सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) गुजरात टायटन्ससमोर 178 धावांचं लक्ष्य ठेवलंय. नाणेफेक हल्यानंतर पहिले फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्यानं इशान किशनसोबत 74 धावांची सलामीची भागीदारी केली. मात्र, रोहितचं अर्धशतक हुकलं. रोहित 28 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 43 धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव फार काही करू शकला नाही आणि 11 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. यानंतर ईशान किशननेही काही मोठे फटके मारले. तो 29 चेंडूत 45 धावा करून बाद झाला. ईशाननं 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. किरॉन पोलार्ड पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला 14 चेंडूत चार धावा करता आल्या. त्याला राशिद खाननं क्लीन बोल्ड केलं.
रोहित शर्माचे खेळी, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पहिली इनिंग झाली
Innings Break! @rashidkhan_19 was the pick of the @gujarat_titans bowlers. ? ?@mipaltan put on a solid show with the bat & posted 177/6 on the board. ? ?
The #GT chase to begin shortly. ? ?
Scorecard ▶️ https://t.co/2bqbwTHMRS #TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/QxCIisugXZ
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2022
टिळक वर्मा आणि टीम डेव्हिड
टिळक वर्मा आणि टीम डेव्हिड यांनी मुंबईचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी रचली. मात्र, 19व्या षटकात मुंबईला दोन धक्के बसले. या षटकात टिळक वर्मा धावबाद झाला. त्यानं 16 चेंडूत 21 धावा काढल्या. यानंतर लॉकी फर्ग्युसनने त्याच षटकात डॅनियल सॅम्सला राशिद खानकरवी झेलबाद केलं. टीम डेव्हिडने शेवटच्या षटकात 13 धावा देत मुंबईला 6 बाद 177 धावांपर्यंत नेलं. डेव्हिड 21 चेंडूत 44 धावा करून नाबाद राहिला. गुजरातकडून राशिदने दोन बळी घेतले. त्याचवेळी अल्झारी जोसेफ, फर्ग्युसन आणि प्रदीप संगवान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
इशान किशनचे पाच चौकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
.@rashidkhan_19 put on a fine display on the ball & was our performer from the first innings of the #GTvMI clash. ? ? #TATAIPL | @gujarat_titans
A summary of his performance ? pic.twitter.com/FEkSdcqkHD
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2022
A round of applause for @DavidMillerSA12 who is playing his 1⃣0⃣0⃣th IPL game. ? ?
Follow the match ▶️ https://t.co/2bqbwTHMRS #TATAIPL | #GTvMI | @gujarat_titans pic.twitter.com/swINQmmBlt
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2022
मुंबई इंडियन्सकडून क्रिकेटप्रेमींना आजच्या विजयाची आशा आहे. तर दुसरीकडे अभिनेता रणवीर सिंह देखील स्टेडियमवर जोशमध्ये दिसून येतोय.
अभिनेता रणवीर सिंह
Say Hello to @RanveerOfficial! ?
Safe to say, he is enjoying a good game of cricket at the Brabourne Stadium – CCI. ? ?
Follow the match ▶️ https://t.co/2bqbwTHMRS #TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/BbAfCn0AkP
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2022
गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, ऋदिमान साहा, साई सुदर्शन/अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ, प्रदीप सांगवान/यश दयाल, लॉकी फर्ग्युसन,
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, टिम डेविड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, डॅनियल सॅम्स, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह