World Cup दरम्यान मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, मलिंग परत मुंबईसाठी खेळणार!

Mumbai Indians Bowling Coach : मुंबई इंडियन्स टीन मॅनेजमेंट आयपीएल 2024 च्या तयारीला लागलेली असल्याचं दिसत आहे. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला असून मलिंगा आता परत मुंबईच्या गोटात दिसणार आहे.

World Cup दरम्यान मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, मलिंग परत मुंबईसाठी खेळणार!
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 5:39 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरू असून भारतीय संघ झकास कामगिरी करत आहे. भारत यंदा वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार मानला जात असून त्याप्रमाणे आतापर्यंत भारतीय संघाने सर्व सामने जिंकले आहेत. अशातच आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी असलेल्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यॉर्कर किंग लसिथ मलिंगा परत एकदा मलिंगावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मलिंगाला लागली लॉटरी

लसिथ मलिंगा याला लॉटरी लागली असून त्याने मुंबई इंडियन्सला अनेक सामने एकहाती जिंकुन दिले आहेत. मलिंगाची मुंबई इंडियन्सच्या मुख्य गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटने मलिंगाकडे आता गोलंदाजीची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड होण ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मार्क बाऊचर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. मुंबईच्या बॉलिंग युनिटमध्ये नवीन टॅलेंटमध्ये चांगली क्षमता असल्याचं  लसिथ मलिंगा याने म्हटलं आहे.

लसिथ मलिंगा आधी राजस्थान रॉयल्स संघामध्ये कोचिंगची जबाबदारी पाहत होता. मुंबईला मलिंगाने अनेक सामने जिंकले असून स्ट्राईक बॉलर म्हणून त्याने मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली होती. मुंबईकडून खेळताना प्रत्येक मोसमामध्ये मलिंगाने आपली जबाबदारी चोख पार पाडली. चेन्नईला १ धावांची गरज असताना मलिंगाने सामना मुंबईला जिंकून दिला होता. मलिंगाने मुंबईसाठी 139 सामने खेळले आणि 7.12 च्या इकॉनॉमीने 195 विकेट घेतल्या.

दरम्यान, मलिंगा 2009 पासून मुंबईसोबत होता, 13 वर्षांमध्ये चार आयपीएल विजेतेपद आणि दोन चॅम्पियन्स लीग T20 विजेतेपद जिंकली आहेत. आता झालेल्या मेजर क्रिकेट लीगमध्येही मुंबईने विजेतेपद आपल्या नावावर केलं होतं. आयपीएल 2024 तयारी मुंबई इंडियन्स टीन मॅनेजमेंट आतापासूनच तयारीला लागलेली दिसत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.