AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: Mumbai Indians साठी इशान किशनचा एक रन्स पडला 8 लाखांना, खूप महागडा ठरला

Mumbai Indians IPL 2022: आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये इशानची बॅट तळपली होती. तिथे इशानने दोन अर्धशतकं झळकावली होती.

IPL 2022: Mumbai Indians साठी इशान किशनचा एक रन्स पडला 8 लाखांना, खूप महागडा ठरला
इशान किशनImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 5:56 PM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) यंदाचा सीजन मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) एखाद्या वाईट स्वप्नासारखा आहे. पाचवेळचा चॅम्पियन संघ आतापर्यंत आठ सामने हरला आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्सची टीम तळाला आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मुंबई इंडियन्सने आठ सामने गमावले आहेत. मुंबईच्या या दयनीय प्रदर्शनात फलंदाजी आणि गोलंदाजीचा मोठा रोल आहे. या दोन्ही आघाड्यांवर मुंबईचा संघ अपयशी ठरला आहे. आयपीएल 2022 च्या लिलावातील महागडा खेळाडू इशान किशन (Ishan kishan) पूर्णपणे फ्लॉप ठरला. पहिल्या दोन सामन्यातील कामगिरी वगळता इशान किशनला आपली छाप उमटवता आलेली नाही. त्याच्या बॅटमधून धावा जणू आटल्या आहेत. डावखुऱ्या इशान किशनने आठ सामन्यात 28.43 च्या सरासरीने फक्त 199 धावा केल्या आहेत.

दिवसेंदिवस त्याच्या फलंदाजीचा ग्राफ घसरतोय

आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये इशानची बॅट तळपली होती. तिथे इशानने दोन अर्धशतकं झळकावली होती. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या दोन सामन्यात त्याने नाबाद 81 आणि 54 धावांची खेळी केली होती. मागच्या सहाडावात इशानने 14,26,3,13,0 आणि आठ धावा केल्या आहेत. म्हणजे दिवसेंदिवस त्याच्या फलंदाजीचा ग्राफ घसरत गेला.

एक रन्स 7.66 लाखांना

इशान किशनला आयपीएल 2022 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने 15.25 कोटीची रक्कम मोजून विकत घेतलं होतं. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत कुठल्याही खेळाडूसाठी इतकी मोठी रक्कम मोजली नव्हती. त्याने केलेल्या 199 धावांची त्याला मिळालेल्या पैशाशी तुलना केली, तर एक रन्स 7.66 लाखांना पडला आहे. इशान किशनने गुजरात लायन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.

कुठला सीजन शानदार होता?

2018 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला 6.2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. आयपीएल 2020 चा सीजन इशानसाठी शानदार होता. त्याने 14 सामन्यात 516 धावा केल्या. मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू होता. इशान किशनच नाही, रोहित शर्मा, कायरन पोलार्ड हे सुद्घा प्रभावी कामगिरी करु शकलेले नाहीत. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह वगळता एकही गोलंदाज प्रभावी ठरलेला नाही. त्यामुळेच मुंबई इंडियन्सचा अजून संघर्षच सुरु आहे.

माहेल जयवर्धने यांनी प्रथमच उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

“इशान किशनवर जी जबाबदारी सोपवली होती, तो ती पूर्ण करु शकलेला नाही” असं जयवर्धन म्हणाले. “आम्ही इशान किशनला त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. पण तो चांगली कामगिरी करु शकला नाही. आम्हाला त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती” असं माहेल जयवर्धने सलग आठ पराभवानंतर म्हणाले.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.