Rohit Sharma IPL 2023 : रोहित शर्माने एयर होस्टेससोबत फोटो काढताना बघा काय केलं? त्या कृतीची सर्वत्र होतेय चर्चा

Rohit Sharma IPL 2023 : सुंदर मुलीसोबत फोटो काढताना बघा, रोहित शर्मावर काय करण्याची वेळ आली?. शर्माने चालू सीजनमध्ये 10 सामन्यात 18.40 च्या सरासरीने 184 धावा केल्या आहेत. त्याने फक्त एक अर्धशतक झळकवलय.

Rohit Sharma IPL 2023 : रोहित शर्माने एयर होस्टेससोबत फोटो काढताना बघा काय केलं? त्या कृतीची सर्वत्र होतेय चर्चा
Rohit sharmaImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 3:26 PM

मुंबई : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा आपल्या धमाकेदार बॅटिंगमुळे चर्चेत असतो. यावेळी रोहित शर्मा चर्चेत येण्यामागे वेगळं कारण आहे. मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फॅन्स रोहितच्या या फोटोमध्ये खूप इंटरेस्ट घेतायत. रोहित शर्मा फोटोत दोन एयरहोस्टेस सोबत दिसतोय. फॅन्स त्यावर वेगवेगळे कमेंटस करतायत. रोहित शर्माने फोटो काढताना, आपलं पोट आतमध्ये खेचलं असं बोललं जातय.

रोहित शर्माने फोटोमध्ये एक स्लिम फिट पोलो टीशर्ट घातलय. टीशर्टमध्ये रोहित शर्मा खूप फिट दिसतोय. रोहित शर्मा आपल्या फिटनेसवर काम करत नाही, असं त्याच्याबद्दल बऱ्याचदा बोललं जातं. त्याच वजन जास्त आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये रोहित शर्मा स्लिम दिसतोय. त्यामुळेच फॅन्सना विश्वास बसत नाहीय. ते रोहितबद्दल वेगवेगळ्या कमेंट्स करतायत.

फोटोमध्ये फिट पण बॅटने अनफिट

रोहित फोटोमध्ये भले फिट दिसतोय, पण बॅटने त्याची फिटनेस चांगली दिसत नाहीय. आयपीएल 2023 मध्ये रोहित शर्माच्या बॅटला जणू गंज चढलाय. रोहित सलग दोन सामने शुन्यावर आऊट झालाय. रोहित शर्माने चालू सीजनमध्ये 10 सामन्यात 18.40 च्या सरासरीने 184 धावा केल्या आहेत. त्याने फक्त एक अर्धशतक झळकवलय. त्याचा स्ट्राइक रेट 126.90 चा आहे.

एक नाही, मागच्या किती सीजनपासून रोहित फ्लॉप

रोहित शर्मासाठी फक्त हा सीजनच खराब ठरलय असं नाहीय. मुंबईच्या कॅप्टनने मागच्या 6 सीजनमध्ये 30 पेक्षा कमी सरासरीने धावा केल्यात. पाचवेळा त्याचा स्ट्राइक रेट 130 पेक्षा कमी होता. रोहित शर्मा आयपीएलमध्ये आपल्या लौकीकाला साजेसा खेळ दाखवत नाहीय. ज्याचा फटका मुंबई इंडियन्सला बसतोय. रोहित शर्माचा खराब फॉर्म पाहून त्याला विश्रांतीचा सल्ला दिला जातोय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी रोहित शर्माला फिट ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी त्याला आराम मिळाला पाहिजे, असं प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.