Ishan kishan Mumbai Indians: ‘इशान एक-दोन सामने खराब खेळला, तर…’, प्राइस टॅगच्या प्रश्नावर कोच माहेला जयवर्धनेच उत्तर
Ishan kishan Mumbai Indians: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) संग्राम सुरु व्हायला आता फक्त दोन दिवस उरले आहेत. आयपीएलचा हा 15 वा हंगाम आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरातच लीग स्टेजचे सर्व सामने होणार आहेत.
मुंबई: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) संग्राम सुरु व्हायला आता फक्त दोन दिवस उरले आहेत. आयपीएलचा हा 15 वा हंगाम आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरातच लीग स्टेजचे सर्व सामने होणार आहेत. आयपीएलमध्ये यंदा आठ ऐवजी दहा टीम्स आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन नव्या टीम्स आपली छाप उमटवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सर्वच संघांचे खेळाडू सध्या नेट्समध्ये घाम गाळतायत. आपल्या फ्रेंचायजीला जेतेपद मिळवून देणं, हेच प्रत्येकाचं लक्ष्य आहे. काल मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्याआधी पत्रकार परिषद घेतली. प्लेईंग इलेवन काय असेल? सूर्यकुमार यादव कधीपर्यंत फिट होणार? मुंबईत खेळण्याचा किती फायदा होणार? असे वेगवेगळे प्रश्न पत्रकारांनी रोहित आणि माहेला जयवर्धने जोडीला विचारले. जयवर्धने मुंबई इंडियन्सचे कोच आहेत.
इशानवर किंमतीचा दबाव असेल का?
कोच माहेला जयवर्धनेना यावेळी एका पत्रकाराने इशान किशनच्या प्राइस टॅग बद्दल प्रश्न विचारला. इशान किशन हा यंदाच्या आयपीएल ऑक्शनमधला सर्वात महागडा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने त्याला 15.25 कोटी रुपये मोजून विकत घेतलं आहे. इतकी मोठी किंमत मोजून विकत घेतल्याचा इशानवर दबाव असेल का? असा प्रश्न जयवर्धनेना विचारला. त्यावर त्यांनी “इशानने मैदानात जाऊन परफॉर्म करण्यासाठी तसं वातावरण बनवण्याची फ्रेंचायजी, टीमवर जबाबदारी आहे”, असं त्यांनी सांगितलं.
काही सामने खराब गेले, तर मात्र…
“आयपीएलच्या ऑक्शनमध्ये कोणाला किती किंमतीला विकत घ्यायचं, हे इशान किंवा अन्य कुठल्या खेळाडूच्या नियंत्रणात नसतं” असं जयवर्धने म्हणाले. रोहित आणि इशान सलामीसाठी एक चांगली जोडी आहे, असं ते म्हणाले. “इशान किशनवर प्राइस टॅगचा दबाव येईल, असं मला वाटत नाही. काम सामने खराब गेले, तर बायो बबल बाहेर याबद्दल चर्चा होईल. तिथून थोडा दबाव टाकला जाईल” असं त्यांनी सांगितलं. “आपल्याला कशी टीम हवी, संघ कसा बनवायचा? हा शेवटी फ्रेंचायजीचा निर्णय होता. इशान किशन गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. त्याला मुंबईची कार्यपद्धती चांगलं माहित आहे. त्यामुळे हा मुद्दा बनेल, असं मला अजिबात वाटत नाही. ” असं माहेला जयवर्धने म्हणाले.
अशा प्लेयर्सवर असते बारीक नजर
इशान किशन एक डावखुरा आक्रमक फलंदाज आहे. आतापर्यंत प्रत्येक सीजनमध्ये त्याने मुंबई इंडियन्ससाठी दमदार कामगिरी केली आहे. एकहाती सामना फिरवण्याची त्याची क्षमता आहे. मेगा ऑक्शननंतर झालेल्या वेस्ट इंडिज आणि श्रीलंके विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेत खेळण्याची इशानला संधी मिळाली होती. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेत त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्यावेळी आयपीएलमध्ये त्याच्यावर दबाव असेल, अशी चर्चा सुरु झाली होती. आतापर्यंत आयपीएलमध्ये महागड्या खेळाडूंनी त्यांच्या किंमतीनुसार खेळ केल्याची फार कमी उदहारण आहेत. अशा प्लेयर्सवर मीडियाची खूप बारीक नजर असते. त्यांच्या कामगिरीबद्दल सातत्याने चर्चा केली जाते.