Mumbai Indians IPL 2022: Arjun Tendulkar चा क्लासिक यॉर्कर, सर्वात महागड्या खेळाडूच्या उडवल्या दांड्या पहा VIDEO

लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धच्या सामन्याच्या आदल्यादिवशी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा फोटो पोस्ट केला होता.

Mumbai Indians IPL 2022: Arjun Tendulkar चा क्लासिक यॉर्कर, सर्वात महागड्या खेळाडूच्या उडवल्या दांड्या पहा VIDEO
Mumbai Indians Arjun Tendulkar Image Credit source: ipl/bcci
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 3:14 PM

मुंबई: लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धच्या सामन्याच्या आदल्यादिवशी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोवरुन अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) IPL डेब्युबद्दल फॅन्समध्ये बरीच चर्चा झाली. शनिवारी प्रत्यक्ष सामन्याच्यादिवशी अर्जुन नाही, तर फॅबिन एलनने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं. अर्जुनला IPL डेब्यु कॅपसाठी अजून किती थांबाव लागणार ? हा प्रश्न चाहत्यांना पडला. अर्जुन ऑलराऊंडर असून तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने बेस प्राइस पेक्षा जास्त दहा लाख रुपये मोजून अर्जुनला आपल्या ताफ्यात घेतलं. अर्जुनला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपये मोजले.

मुंबई इंडियन्सने त्यांच्या युट्यूबवर पोस्ट केला व्हिडिओ

मुंबई इंडियन्सचा आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सामना होणार आहे. त्याआधी अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सराव सत्रातला हा व्हिडिओ आहे. यात अर्जुनने आपल्या क्लासिक यॉर्करने मुंबईचा डावखुरा सलामीवीर इशान किशनच्या दांड्या उडवल्या आहेत इशान किशन हा यंदाच्या मेगा ऑक्शनमधला सर्वात महागडा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी 15.25 कोटी रुपये मोजले आहेत. मुंबई इंडियन्सने त्यांच्या युट्यूबवर सुंदर कॅप्शनसह हा व्हिडिओ पोस्ट केलाय.

मुंबई इंडियन्सच्या स्क्वाडचा नेट बॉलर

व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मेसेजेसचा पूर आला आहे. त्यात अर्जुन तेंडुलकरचा संघात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागच्या काही वर्षांपासून अर्जुन मुंबई इंडियन्सच्या स्क्वाडचा नेट बॉलर होता. आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला विकत घेतलं. मागच्या सीजनमध्ये अर्जुन तेंडुलकरला संघात संधी मिळाली नव्हती.

फक्त जसप्रीत बुमराह दमदार

यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सची खूप खराब कामगिरी सुरु आहे. ते अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबई इंडियन्सचा मागच्या सहा सामन्यात पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्सने अर्जुनला एक संधी देऊन पहायला हरकत नाही. यंदा जसप्रीत बुमराह वगळता एकाही गोलंदाजाला आपली छाप उमटवता आलेली नाही.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.