Mumbai Indians : Rohit sharma ला मिळणार आराम, ‘हा’ खेळाडू करणार मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप

Mumbai Indians : मुंबई इंडियन्ससोबत रोहित शर्मा भारतीय टीमचाही कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायजींना भविष्याचा विचार करुन रोहितबाबत हा निर्णय घेतलाय. फ्रेंचायजीच्या या निर्णयामुळे चाहत्यांच मन नक्कीच मोडलं असणार. कारण त्यांना रोहितची आतषबाजी पाहता येणार नाही.

Mumbai Indians : Rohit sharma ला मिळणार आराम, 'हा' खेळाडू करणार मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप
rohit sharma Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 7:53 AM

Mumbai Indians News : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या सीजनमध्ये टीमचा कॅप्टन रोहित शर्मा कदाचित सर्व सामने खेळताना दिसणार नाही. मुंबई इंडियन्सचे फॅन्स आणि रोहित शर्माच एक वेगळं नातं आहे. त्यामुळे रोहित सर्व सामन्यांमध्ये खेळणार नाही, ही मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी निराश करणारी बातमी आहे. रोहित शर्मा या सीजनमध्ये आपल्या मर्जीने खेळणार आहे. कुठल्या मॅचमध्ये खेळायच आणि कुठल्या मॅचमध्ये नाही, हे रोहित स्वत: ठरवणार आहे.

मागच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच निराशाजनक होती. 14 पैकी 10 सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सची टीम पॉइन्टस टेबलमध्ये तळाला होती.

मुंबईचा पहिला सामना कधी?

इंडियन प्रीमिअर लीगचा 16 वा सीजन 31 मार्चपासून सुरु होतोय. मुंबईचा पहिला सामना 2 एप्रिलला बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध होतोय. रोहित लीग राऊंडमध्ये सर्वच्या सर्व 14 सामने खेळणार नाही.

मुंबई इंडियन्सची टीम हे का करतेय?

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सची टीम भारतीय कर्णधाराचा वर्कलोड मॅनेज करण्यासाठी हे सर्व करतेय. आयपीएल नंतर भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात भारतात वर्ल्ड कप होणार आहे. रोहितला थकवा जाणवू नये, आराम मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

रोहितच्या जागी मुंबई इंडियन्सच नेतृत्व कोण करणार?

रोहितला त्याच्या सोयीनुसार, कुठल्या मॅचमध्ये खेळायच? कुठल्या मॅचमध्ये नाही, हे ठरवण्याचा अधिकार असेल. रोहित ज्या मॅचमध्ये खेळणार नाही, त्या सामन्यात सूर्यकुमार यादव टीमच नेतृत्व करेल. सूर्या टेस्ट टीमचा भाग नाहीय, त्याशिवाय तो वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची शक्यताही कमी आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंबद्दलचे अधिकार कोणाकडे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटच्या वनडे सामन्यानंतर रोहित शर्माने वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल विधान केलं होतं. आयपीएलमध्ये खेळाडूंसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार फ्रेंचायजींकडे आहे. खेळाडूंचा वर्कलोड मॅनेज करण्याची जबाबदारी त्यांची असेल. आपल्या काय हवं? ते ठरवण्याचा अधिकार त्या खेळाडूकडे असेल. त्याला आरामाची आवश्यकता असेल, तर तो एक-दोन सामन्यातून ब्रेक घेऊ शकतो.

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.