Video : मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी विजय, साहा आणि शुभमनची अर्धशतकं, पाहा Highlights Video
गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरातसाठी हा पराभव आश्चर्यचकित करणारा ठरलाय. कारण 12व्या षटकापर्यंत संघाने 106 धावांत एकही विकेट गमावली नव्हती. त्यानंतर संघाची दमछाक झाली.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) गुजरात टायटन्सचा (GT) पाच धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावाच करू शकला. अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी नऊ धावांची गरज होती. मात्र, संघाला केवळ तीन धावा करता आल्या. शेवटच्या षटकात डॅनियल सॅम्सने अप्रतिम गोलंदाजी केली. तर त्याच्यासमोर डेव्हिड मिलर आणि राहुल टिओटिया होते. 20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवर एकही रन नाही. तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्यानं तेवातिया धावबाद झाला. राशिद खाननं चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सॅम्सने मिलरला एकही धाव काढू दिली नाही. अशा प्रकारे मुंबई जिंकली. गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरातसाठी हा पराभव आश्चर्यचकित करणारा ठरलाय. कारण 12व्या षटकापर्यंत संघाने 106 धावांत एकही विकेट गमावली नव्हती. त्यानंतर संघाची दमछाक झाली.
मिलरचे षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
WHAT. A. WIN! ? ?
What a thriller of a game we have had at the Brabourne Stadium-CCI and it’s the @ImRo45-led @mipaltan who have sealed a 5⃣-run victory over #GT. ? ?
Scorecard ▶️ https://t.co/2bqbwTHMRS #TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/F3UwVD7g5z
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2022
साहा आणि शुभमनची अर्धशतके
12 षटकांनंतर गुजरात टायटन्सने एकही विकेट न गमावता 106 धावा केल्या. मुंबईचे गोलंदाज विकेटसाठी आसुसलेले आहेत. असं दिसताच त्याचवेळी गुजरातचे सलामीवीर रिद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत अर्धशतके झळकावली. साहाच्या आयपीएल कारकिर्दीतील हे दहावे अर्धशतक होते. त्याचबरोबर या मोसमात त्याने आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली आहेत. शुभमनने आयपीएल कारकिर्दीतील तेरावे अर्धशतक झळकावले आहे.
5⃣0⃣ for @ShubmanGill ? ?
5⃣0⃣ for @Wriddhipops ? ?
1⃣0⃣0⃣-run stand between the two @gujarat_titans openers in the chase. ? ?
Follow the match ▶️ https://t.co/2bqbwTHMRS#TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/OwmaLrm7d4
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2022
Thank you, @ShubmanGill & @Wriddhipops, for scoring 5⃣0⃣s together!
????? ????? ?? ???? ???? ????? ????… ? pic.twitter.com/s5cRb5TixZ
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 6, 2022
मुंबई इंडियन्स
कर्णधार रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्यानं इशान किशनसोबत 74 धावांची सलामीची भागीदारी केली. मात्र, रोहितचं अर्धशतक हुकलं. रोहित 28 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 43 धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव फार काही करू शकला नाही आणि 11 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. यानंतर ईशान किशननेही काही मोठे फटके मारले. तो 29 चेंडूत 45 धावा करून बाद झाला. ईशाननं 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. किरॉन पोलार्ड पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला 14 चेंडूत चार धावा करता आल्या. त्याला राशिद खाननं क्लीन बोल्ड केलं.