सचिनच्या मुलाचं मुंबई इंडियन्सकडून 50 % इन्क्रीमेन्ट! अर्जुनला अखेर मुंबईनं आपल्याच पलटनमध्ये ठेवलं

IPL Auction 2022 : र्जुन कोणत्या संघातून आयपीएलच्या मैदानात उतरतो आणि कशी कामगिरी करतो, यावर सगळ्यांचच लक्ष लागलेलं होतं. अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज असून तो सध्या 22 वर्षांचा आहे.

सचिनच्या मुलाचं मुंबई इंडियन्सकडून 50 % इन्क्रीमेन्ट! अर्जुनला अखेर मुंबईनं आपल्याच पलटनमध्ये ठेवलं
अखेर अर्जुन तेंडुलकरला मुंबईनच घेतलं!
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 8:36 PM

मुंबई : दिग्गज खेळाडूंवर कितीची बोली लागते, याकडे जशी नजर सगळ्यांची असते, तशीच नजर ही छोट्या खेळाडूंवरही असते. अशातच आता जर का अर्जुन तेंडुलकरवर (Arjun Tendulkar) नजर नाही राहिली, तरच आश्चर्य! पण आतापर्यंतच्या बोलीत तरी अर्जुन तेंडुलकरचं नाव समोर आलं नव्हतं. अखेर रात्री उशिरा अर्जुनच्या नावावर बोली लावण्यात आली. मात्र तोपर्यंत ट्वीटरवर आणि इतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) अर्जुन तेंडुलकरला आपल्यासोबत ठेवणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होत. गेल्याच वर्षी मुंबई इंडियन्सनं अर्जुन तेंडुलकरला आपल्या चमूत सामील करुन घेतलं होतं. त्यानंतर अर्जुन तेंडुलकरवर 20 लाखाची बेस प्राईज ठेवत त्याचा लिलाव केला गेला. यावेळी अर्जुन तेंडुलवरवर कितीची बोली लागते, याकडे सगळ्यांची नजर लागली होती. सचिन तेंडुलकरचा मुलगा (Son of Sachin Tendulkar) असलेल्या अर्जुनला मुंबई आपल्यासोबत ठेवणार काही नाही, याचीच जास्त चर्चा रंगली असतानाच मुंबईनं अर्जुनला रिटेन केलंय.

मुंबईनं आपल्याच पलटनमध्ये ठेवलं!

आयपीएल ऑक्शनचा रविवार हा दुसरा दिवस आहे. रविवारी दिवसभरात वेगवेगळ्या छोट्या मोठ्या खेळाडूंवर बोली लावण्यात आल्या. यावेळी अनेकांची नजर ही अर्जुन तेंडुलकरच्या बोलीकडे लागलेली होती. अखेर अर्जुन तेंडुलकरला 30 लाखात विकत घेण्यात आलंय. मुंबई इंडियन्सं अर्जुला विकत घेतलंय.

त्यामुळे अनेकांनी व्यक्त केलेली शक्यता अखेर खरी ठरली आहे. मुंबईन सचिनच्या मुलाला रिटेन केलं असून त्यासाठी 30 लाख रुपये मोजलेत. 2021मध्येही अर्जुन मुंबई इंडियन्सच्या सोबत होता. सचिन तेंडुलकर हा देखील आयपीएल सुरु झाल्यापासूनच मुंबई इंडियन्स संघासोबत जोडला गेलेला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघासोबत सचिनचे आणि संघ व्यवस्थापनाचेही जवळचे संबंध आहेत. अशातच अर्जुनला मुंबई इंडियन्स रिलीज करण्याची शक्यताही कमी असल्याचंच बोललं जातं होतं. अखेरीस झालंही तसंच

20 लाख बेस प्राईज..!

अर्जुन तेंडुलकरवर 20 लाख बेस प्राईज ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे तो सोल्ड होतो की अनसोल्ड राहतो, याकडे अनेक जाणकारांची बारीक नजर होती. मुंबईसोबतच गुजरानंही अर्जुनसाठी बोली लावली होती. मात्र अखेर मुंबई इंडियन्सनं 30 लाखात त्याला विकत घेतलंय. गेल्या वर्षी जखमेमुळे अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

दरम्यान, यावेळी अर्जुन कोणत्या संघातून आयपीएलच्या मैदानात उतरतो आणि कशी कामगिरी करतो, यावर सगळ्यांचच लक्ष लागलेलं होतं. अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज असून तो सध्या 22 वर्षांचा आहे. भारताच्या अंडर-19 संघातही अर्जुनचा समावेश झाला होता.

ट्वीटरवर ट्रेन्ड!

सध्या ट्वीटरवर अर्जुन तेंडुलकर ट्रेन्ड होत असून अनेकांनी तो कुठं आहे? त्याची बोली कधी लागणार असा सवाल उपस्थित केला जात होता. दिवसभर आयपीएल चाहत्यांनी अर्जुनच्या बोलीवरुन वेगवेगळ्या चर्चाही सुरु केल्या होत्या. अखेर मुंबईनं त्याला आपल्याच चमूत कायम ठेवलंय.

संबंधित बातम्या :

Tushar Deshpande IPL 2022 Auction: धोनीच्या टीममधून खेळणारा मराठी मुलगा तुषार देशपांडे कोण आहे?

CSK IPL Auction 2022: चेन्नईची टीम तयार! धोनीच्या संघात कुणाला घेतलं? कुणाला नाही? जाणून घ्या

RCB IPL Auction 2022: विराटच्या RCB ने आतापर्यंत विकत घेतलेल्या खेळाडूंच्या यादीवर एक नजर मारा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.