Arjun Tendulkar IPL 2023 : रोहित शर्मा अर्जुनचा योग्य वापर कधी करणार? कॅप्टन म्हणून चुकतोय?
Arjun Tendulkar IPL 2023 : यंदाच्या IPL 2023 च्या सीजनमध्ये अर्जुन तेंडुलकरने आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. पण कॅप्टन रोहित शर्मा त्याच्या क्षमतेला न्याय देत नाहीय, असंच म्हणाव लागेल.

Arjun Tendulkar IPL 2023 : आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये अर्जुन तेंडुलकरच नाव चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सची टीम मैदानावर उतरते, तेव्हा अर्जुन तेंडुलकरची चर्चा होते. अर्जुन आपल्या गोलंदाजीमुळे चर्चेत आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने भले जास्त विकेट घेतले नसतील, पण त्याने आपली क्षमता सर्वांना दाखवून दिलीय. अर्जुनने सलग चार सामन्यात पावरप्लेमध्ये कमालीची गोलंदाजी केलीय. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने वुद्धिमान साहा आणि शुभमन गिल सारख्या स्फोटक फलंदाजांना जखडून ठेवलं.
अर्जुन तेंडुलकर आतापर्यंत 4 आयपीएल सामने खेळलाय. त्यात त्याने पावरप्लेमध्ये किफायती गोलंदाजी केलीय. गुजरात विरुद्ध पावरप्लेमध्ये अर्जुनने 2 ओव्हर टाकले. त्यात त्याने 9 रन्स देऊन साहाचा विकेट काढला. पंजाब विरुद्ध पावरप्लेमध्ये रोहितने अर्जुनला फक्त एक ओव्हर दिली. त्यात त्याने 5 रन्स दिल्या. या मॅचमध्ये त्याचे आकडे खराब होते. पण पावरप्लेमध्ये त्याने विरोधी फलंदाजांना बांधून ठेवलं.
असा आहे पावरप्लेमध्ये अर्जुनच्या गोलंदाजीचा जलवा
हैदराबाद विरुद्ध सामन्यात अर्जुनचा जलवा दिसला. पावरप्लेमध्ये अर्जुनने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिल्या. त्याच्यासमोर हॅरी ब्रूक सारखा फलंदाज स्ट्राइकवर होता. पावरप्लेच्या दोन ओव्हरमध्ये अर्जुनने फक्त 14 रन्स दिल्या. पहिल्या आयपीएल मॅचमध्ये केकेआर विरुद्ध त्याने 2 ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या.
अर्जुनच्या यशाच रहस्य काय?
अर्जुन तेंडुलकर पावरप्लेमध्ये इतकी फायदेशीर गोलंदाजी कशी करतो? त्यामागे कारण आहे, अर्जुनच्या गोलंदाजीतील स्विंग. अर्जुन तेंडुलकर नव्या चेंडूचा चांगला फायदा उचलतो. त्याची लेंग्थ चांगली आहे. त्यामुळे स्विंगचा तो चांगला उपयोग करतो. रोहितच काय चुकतय?
नव्या चेंडूने चांगली गोलंदाजी करु शकतो, हे अर्जुन तेंडुलकरने सिद्ध केलय. त्याचा स्विंगवर कंट्रोल आहे. अशावेळी मुंबई इंडियन्सची मॅनेजमेंट आणि कॅप्टन म्हणून रोहित शर्माने अर्जुनच्या भूमिकेत बदल केला पाहिजे. पावरप्लेमध्ये त्याला कमीत कमी 3 ओव्हर दिल्या पाहिजेत. त्यामुळे त्याच्याकडे विकेट घेण्याची जास्त संधी असेल. मुंबई टीमलाच त्याचा फायदा होईल.