MI vs RR IPL 2023 : 6,6,6, मुंबईच्या विजयाचा हिरो Tim David ची तुफान खेळीनंतर पहिली प्रतिक्रिया

MI vs RR IPL 2023 : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात विजय शक्य झाला, ते फक्त टिम डेविडमुळे. डेविडची बॅटिंग पाहून आतापासूनच त्याची कायरन पोलार्ड बरोबर तुलना सुरु आहे. टिम डेविडने काल तुफान कामगिरी केली.

MI vs RR IPL 2023 : 6,6,6, मुंबईच्या विजयाचा हिरो Tim David ची तुफान खेळीनंतर पहिली प्रतिक्रिया
IPL 2023 Tim davidImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 8:02 AM

मुंबई : मुंबई इंडियन्सने काल राजस्थान रॉयल्सवर 6 विकेट राखून थरारक विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने विजयासाठी दिलेलं 213 धावांच लक्ष्य मुंबईने शेवटच्या ओव्हरमध्ये पार केलं. मुंबई इंडियन्सच्या या विजयाचा हिरो ठरला टिम डेविड. 14 बॉलमधील त्याच्या तुफानी बॅटिंगमुळे मुंबई इंडियन्सला विजय साकारता आला. डेविडने त्याच्या खेळीत 2 चौकार आणि 5 सिक्स मारले.

जेसन होल्डर टाकत असलेल्या लास्ट ओव्हरमध्ये त्याने पहिल्या तीन बॉलमध्ये 3 सिक्स मारुन मुंबई इंडियन्सला रोमांचक विजय मिळवून दिला. टिम डेविड मुंबई इंडियन्सकडून 16 वा सामना खेळला.

टिम डेविडमध्ये असं काय खास आहे?

पावर हिटिंगच्या क्षमतेमुळे मुंबई इंडियन्सने त्याला मागच्यावर्षी आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये विकत घेतलं होतं. मागच्यावर्षीच या प्लेयरने आपली गुणवत्ता दाखवून दिली होती. कालच्या सामन्यात पुन्हा एकदा टिम डेविडची लांब, लांब फटके मारण्याची क्षमता दिसून आली. या कामगिरीमुळे टिम डेविडची कायरन पोलार्डशी तुलना केली जातेय.

अशी कामगिरी करणारी मुंबई पहिली टीम

आयपीएलच्या इतिहासात वानखेडे स्टेडियमवर 200 पेक्षा जास्त धावांच टार्गेट चेस करणारी मुंबई इंडियन्स पहिली टिम ठरली आहे. कायरन पोलार्ड आता मुंबई इंडियन्ससाठी बॅटिंग कोचच्या भूमिकेत आहे. पोलार्ड नसल्याने निर्माण होणारी पोकळी टिम डेविड भरुन काढू शकतो का? या प्रश्नाच उत्तर लवकरच मिळेल.

विजयानंतर टिम डेविडची पहिली प्रतिक्रिया

“आम्हाला निकाल हवा होता. ही खूप सुंदर भावना आहे. मैदानावरील प्रेक्षक आमचा उत्साह वाढवत होते. जेव्हा आम्ही वानखेडेवर खेळतो, त्यापेक्षा कुठली सुंदर भावना नाहीय. मागच्या दोन सामन्यात आमच्याकडून चांगली कामगिरी झाली नव्हती” असं टिम डेविड म्हणाला. “वानखेडेवर आज बॅटिंग करण्यासाठी चांगली परिस्थिती होती. इथे बॉलिंग करणं, गोलंदाजांसाठी आव्हानात्मक होतं. मी संघासाठी अशी विजयी कामगिरी करण्यासाठी आतुर होतो. अखेर ती संधी मिळाली. खूप सुंदर वाटतय” असं टिम डेविड म्हणाला. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई कितव्या स्थानावर?

हा सामना जिंकण्याआधी मुंबईची टीम नवव्या क्रमांकावर होती. आता मुंबई संघाने सातव्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबईचे आता 8 गुण झाले असून रनरेट -0.502 झाला आहे. पहिल्या स्थानी गुजरात टायटन्स 12 गुणांसह (+.638) आहे. दुसऱ्या स्थानी लखनऊ सुपर जायंट्स दहा गुणांसह (+0.841) आहे. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स 10 गुणांसह (+0.800) आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.