IPL 2022 MI vs RR Head to Head: मुंबई विरुद्ध राजस्थान, कोण मारणार बाजी? पाहा आत्तापर्यंतची आकडेवारी

Mumbai Indians vs Rajasthan Royals: पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता, तर राजस्थानने विजयासह यंदाच्या आयपीएल हंगामाची सुरुवात केली आहे. शनिवारी दोन्ही संघ मोसमात पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.

IPL 2022 MI vs RR Head to Head: मुंबई विरुद्ध राजस्थान, कोण मारणार बाजी? पाहा आत्तापर्यंतची आकडेवारी
Rajasthan RoyalsImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 1:55 PM

मुंबई : एक-दोनदा नव्हे तर तब्बल पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सची आयपीएल 2022 मध्ये खराब सुरुवात झाली आहे. मुंबईला दिल्लीविरुद्ध पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता विजयाचं खातं उघडण्यासाठी शनिवारी होणाऱ्या डबल हेडर सामन्यात संघाचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) संघाला या सामन्यात कोणत्याही किंमतीत विजय मिळवायचा आहे जेणेकरून त्यांना यंदाच्या मोसमातील विजयाचं खातं उघडता येईल. मात्र, संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) संघ पहिला सामना जिंकल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरणार असल्याने मुंबईसाठी हे आव्हान सोपं नसेल.

या मोसमातील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला. या सामन्यात त्यांनी हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. तर मुंबईचा दिल्लीकडून पराभव झाला. आता दोन्ही संघ आमनेसामने येतील तेव्हा राजस्थान रॉयल्सचा संघ आपली मागील आकडेवारी सुधारण्याचा प्रयत्न करेल. आकडेवारीचा विचार करता मुंबईचा संघ राजस्थानवर थोडा वरचढ राहिला आहे.

आतापर्यंतच्या 25 सामन्यांमध्ये कोण ठरलंय वरचढ?

डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणारा हा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएलमधील आतापर्यंतचा 26 वा सामना असेल. आतापर्यंत झालेल्या 25 सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर इथे अगदी कमी फरकाने का असेना पण मुंबई थोडी पुढे दिसते. मुंबईने 25 पैकी 13 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्सने 11 सामने जिंकले आहेत. 2009 मध्ये या दोन संघांमध्ये खेळवलेला एक सामना अनिर्णित राहिला होता. गेल्या मोसमाबद्दल बोलायचे झाले तर साखळी फेरीतील दोन्ही सामने मुंबई इंडियन्सने मोठ्या फरकाने जिंकले होते.

संजू सॅमसनचा दरारा

जर आपण खेळाडूंच्या आकडेवारीबद्दल बोललो, तर दोन्ही संघांमधील 25 सामन्यांमध्ये संजू सॅमसनच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत, ज्याने 416 धावा केल्या आहेत. त्याचवेळी कायरन पोलार्ड आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहेत, या दोघांनी 316 धावा फटकावल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजांमध्ये मुंबईचा धवल कुलकर्णी आघाडीवर आहे, ज्याने राजस्थानविरुद्ध 17 विकेट्स घेतल्या आहेत. जो यंदा मुंबईचा भाग नाही. कुलकर्णी सध्या समालोचनाची जबाबदारी सांभाळत आहे. उभय संघांमधील गोलंदाजांच्या बाबतीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने राजस्थानविरुद्ध 14 बळी घेतले आहेत. तर जोफ्रा आर्चरने 12 विकेट्स घेतल्या आहेत.

शेवटच्या सामन्याचा निकाल काय होता?

हे दोन्ही संघ गेल्या वर्षी यूएईतल्या शाहजाहच्या मैदानावर अखेरचा सामना खेळले होते. त्यावेळी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला केवळ 90 धावा करता आल्या. मुंबईतर्फे नॅथन कुल्टर नाईलने चार आणि जेम्स नीशमने तीन बळी घेतले होते. तर दुसरीकडे, इशान किशनने 25 चेंडूत 50 धावा केल्या होत्या, ज्याच्या जोरावर मुंबईने हे लक्ष्य केवळ 8.2 षटकात पूर्ण केले.

इतर बातम्या

IPL 2022 points table मध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

IPL 2022, Orange Cap : फॅफ डू प्लेसिसकडे ऑरेंज कॅपचा ताबा कायम, चेन्नईचे स्टार्स देखील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत

KKR vs PBKS, IPL 2022 Match Prediction: स्फोटक फलंदाज ओडियन स्मिथ KKR वर भारी पडणार? आजची मॅच कोण जिंकणार?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.