AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिनेश कार्तिकनंतर आता तामिळनाडूचाच मुरली विजयही मैदानावर धडाकेबाज खेळ दाखवण्यासाठी सज्ज

IPL 2022 नंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) धडाकेबाज खेळ सुरु आहे. आयपीएलच्या या सीजनमध्ये दमदार प्रदर्शन करुन तब्बल 3 वर्षानंतर भारतीय संघात त्याने स्थान मिळवलय.

दिनेश कार्तिकनंतर आता तामिळनाडूचाच मुरली विजयही मैदानावर धडाकेबाज खेळ दाखवण्यासाठी सज्ज
murli vijayImage Credit source: instagram
| Updated on: Jun 19, 2022 | 7:22 PM
Share

मुंबई: IPL 2022 नंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) धडाकेबाज खेळ सुरु आहे. आयपीएलच्या या सीजनमध्ये दमदार प्रदर्शन करुन तब्बल 3 वर्षानंतर भारतीय संघात त्याने स्थान मिळवलय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या टी 20 सीरीजमध्ये दिनेश कार्तिकचा जलवा कायम आहे. भारताच्या एका अनुभवी खेळाडूने बऱ्याच कालावधीनंतर जबरदस्त पुनरागमन केलय. दिनेश कार्तिकसोबत खेळलेला मुरली विजयही (Murli Vijay) आता 2 वर्षानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कार्तिक प्रमाणे मुरलीला सुद्धा वादळी पुनरागमन करायचं आहे. तो यंदा तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत खेळणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. लीगचा सहावा सीजन 23 जून ते 31 जुलै दरम्यान खेळला जाणार आहे.

व्यक्तीगत आयुष्याबद्दल मुरली विजय म्हणाला…

38 वर्षांचा मुरली शेवटचा आयपीएल 2020 मध्ये मैदानावर दिसला होता. त्याने चेन्नई सुपर किंग्सच प्रतिनिधीत्व केलं होतं. आता तो तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये त्रिची वॉरियर्सकडून खेळताना दिसेल. दोन वर्ष मैदानापासून दूर रहाण्याचं कारण मुरली विजयने सांगितलं. “मला खेळायचं होतं, पण मला दुखापत झाली होती. माझं व्यक्तीगत आयुष्यही वेगात चाललेलं. मला तो वेग कमी करायचा होता. त्यामुळे मला एका ब्रेकची आवश्यकता होती. तामिळनाडू प्रीमियर लीगने माझी परिस्थिती समजून मला प्लॅटफॉर्म दिला, हे माझं नशीब आहे” असं मुरली विजय म्हणाला.

आरसीबीसाठी तो फिनिशर ठरला

दिनेश कार्तिकबद्दल बोलायचं झाल्यास त्याने 2019 वर्ल्ड कप नंतर भारतासाठी एकही सामना खेळला नव्हता. कोलकाता नाइट रायडर्सकडूनही त्याला विशेष चमक दाखवता आली नव्हती. मागच्यावर्षी त्याने भारताच्या इंग्लंड दौऱ्यात कॉमेंट्री सुद्धा केली होती. कार्तिकचं करीयर संपलं, असं अनेकांना वाटत होतं. मात्र आयपीएलच्या या सीजनमध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून 16 सामन्यात 183 च्या स्ट्राइक रेटने 330 धावा केल्या. आरसीबीसाठी तो फिनिशर ठरला. कार्तिकच्या खासगी जीवनाबद्दल बोलायच झाल्यास, त्याचं पहिलं लग्न निकिता बरोबर झालं होतं. पण त्याचवेळी निकिता कार्तिकचाच तामिळनाडू टीममधील सहकारी मुरली विजयच्या प्रेमात पडली. दोघांचे विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. त्यानंतर कार्तिकने निकिताला घटस्फोट दिला व स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकल बरोबर लग्न केलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.