AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022: Naseem shah ने काय बॉल टाकला, एकदम लांबलचक उडाला स्टम्प VIDEO

T20 World Cup 2022: नसीम शाहने परफेक्ट ऑफ स्टम्पवर चेंडू टाकला होता, त्यावेळी सॉल्टने...

T20 World Cup 2022: Naseem shah ने काय बॉल टाकला, एकदम लांबलचक उडाला स्टम्प VIDEO
naseem shah Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 12:30 PM

ब्रिस्बेन: इंग्लंडचा प्लेयर (England player) फिल सॉल्टने (phil salt) काही दिवसांपूर्वी आपल्या बॅटची ताकत दाखवून दिली होती. त्याने पाकिस्तान विरुद्ध (ENG vs PAK) त्यांच्याच घरात 19 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. सोमवारी पुन्हा एकदा इंग्लंड आणि पाकिस्तानची टीम आमने-सामने आली. पण यावेळी सॉल्ट काही करु शकला नाही. पाकिस्तानच्या युवा गोलंदाजाने खेळपट्टीवर जम बसवण्याआधीच सॉल्टला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

सॉल्ट फेल झाला

सॉल्ट यावेळी दोन आकडी धावसंख्याही गाठू शकला नाही. पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये टी 20 वर्ल्ड कप आधी वॉर्मअप मॅच झाली. या सामन्यात सॉल्ट फेल झाला.

पण त्याचा अंदाज चुकला

सॉल्टने या मॅचमध्ये फक्त एक रन्स केला. दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर सॉल्टला पाकिस्तानचा स्पीड स्टार नसीम शाहने क्लीन बोल्ड केलं. नसीमने ऑफ स्टंम्पवरप लेंग्थ चेंडू टाकला. सॉल्टने बाहेर येऊन हा बॉल मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा अंदाज चुकला तो क्लीन बोल्ड झाला. चेंडू इतका वेगात होता की, बॉल स्टम्पला लागताच स्टम्प बराच लांबलचक जाऊन पडला.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

पाकिस्तानमध्ये त्याचं प्रदर्शन कसं होतं?

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये इंग्लंडच्या टीमने पाकिस्तानचा दौरा केला. या टूरमध्ये इंग्लंड-पाकिस्तानमध्ये 7 टी 20 सामने झाले. या सीरीजमध्ये तीन मॅचमध्ये सॉल्टने दोन आकडी धावसंख्या गाठली. सहाव्या मॅचमध्ये सॉल्ट 88 धावांची इनिंग खेळला होता. त्याशिवाय दुसऱ्या मॅचमध्ये त्याने 30 धावा केल्या होत्या. शेवटच्या टी 20 सामन्यात त्याने 20 धावा केल्या होत्या.

सॉल्ट आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. सॉल्ट आतापर्यंत 11 टी 20 सामने खेळला आहे. त्यात त्याने 235 धावा केल्यात. दोन अर्धशतक त्याने झळकावली आहेत.

घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती.
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.