Video : इंग्लंड श्रीलंका कसोटीत काय घडलं? कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेला नासिर हुसैन खुर्चीतून पडला

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू असताना एक विचित्र प्रकार घडला. सदर दृश्य पाहिल्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेला माजी क्रिकेटपटू नासिर हुसैन खुर्चीतून पडला. असं नेमकं काय घडलं? की अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

Video : इंग्लंड श्रीलंका कसोटीत काय घडलं? कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेला नासिर हुसैन खुर्चीतून पडला
Image Credit source: (Photo: Gareth Copley/Getty Images)
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 5:58 PM

तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना श्रीलंकेने जिंकला. दुसऱ्या डावात इंग्लंडने श्रीलंकेसमोर 219 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान श्रीलंकेने 2 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात पाथुम निस्संकाने शतकी खेळी केली. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने हा विजय मिळवला. पण या सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. हा प्रकार पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेला नासिर हुसैन खुर्चीतून पडता पडता वाचला. ही घटना सामन्याच्या दुसऱ्या दिवशी घडली. पण सुदैवाने या घटनेत नासिर हुसैनला कोणतीही दुखापत झाली नाही. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या डावात हा प्रकार घडला. दुसऱ्या सत्राचा खेळ संपण्यासाठी अवघ्या अर्धा तासाचा अवधी शिल्लक होता. तेव्हा काळे ढग जमा झाले आणि अंधुक प्रकाशात खेळण्याची वेळ आली. त्यामुळे पंचांनी दखल घेत खेळ थांबवण्याची विनंती इंग्लंडच्या कर्णधाराकडे केली.  जर तसं नको असेल तर वेगवान गोलंदाजांना गोलंदाजी करण्यास मज्जाव केला. याचा अर्थ असा की खेळ सुरु ठेवायचा असेल तर फिरकीपटूंना गोलंदाजी करायला द्यावी. मग काय इंग्लंडचा कर्णधार ओली पोपने फिरकी गोलंदाजी करण्यास तयार झाला.

पंचांनी सांगितलं तेव्हा ख्रिस वोक्स गोलंदाजी करत होता आणि त्याने षटकातील 2 चेंडू टाकले होते. त्यामुळे पोपने त्याला उर्वरित चार चेंडू फिरकी टाकण्यास सांगितलं. त्याच्या फिरकीचा प्रभाव कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसला. ख्रिस वोक्सला फिरकी टाकताना पाहून नासिर हुसैन यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याने आपली प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी मागे पाहायला गेले आणि खुर्चीतच वळले. पण झालं असं की खुर्चीचा तोल एका बाजूला गेला आणि पडता पडता वाचला.

इंग्लंडचं श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्याचं स्वप्न भंगलं आहे. इंग्लंडने मालिका आधीच 2-0 ने खिशात घातली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचं कठीण झालं होतं. पण श्रीलंकेने कमबॅक केलं. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने पहिल्या डावात 325 धावा केल्या आणि त्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने पहिल्या डावात 263 धावा केल्या. इंग्लंडकडे 92 धावांची आघाडी होती. यासह पुढे खेळताना इंग्लंडचा डाव गडगडला आणि संपूर्ण संघ अवघ्या 156 धावांवर तंबूत परतला. इंग्लंड समोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान इंग्लंडने 2 गडी गमवून पूर्ण केलं.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.