AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naveen ul haq IPL 2023 : ‘मी कोहली, कोहलीच्या घोषणा ऐकतो, तेव्हा मला….’, अखेर नवीन उल हकने सोडलं मौन

Naveen ul haq IPL 2023 : कोहली, कोहलीच्या घोषणा देऊन प्रेक्षक नवीन उल हकची खिल्ली उडवतात. त्या वादावर नवीन आता व्यक्त झाला आहे. नवीन उल हकने विराट कोहलीशी पंगा घेतला होता.

Naveen ul haq IPL 2023 : 'मी कोहली, कोहलीच्या घोषणा ऐकतो, तेव्हा मला....', अखेर नवीन उल हकने सोडलं मौन
Virat kohli vs Naveen ul haq ipl 2023Image Credit source: Screengrab
| Updated on: May 25, 2023 | 12:17 PM
Share

चेन्नई : मागच्या 25 दिवसांपासून IPL 2023 मध्ये नवीन उल हकला टार्गेट केलं जातय. तो सीमारेषेवर उभा दिसला की, प्रेक्षकांकडून कोहली, कोहलीच्या घोषणा दिल्या जातात. क्रिकेटप्रेमी त्याला मुद्दामून डिवचण्यासाठी असं करतात. या महिन्याच्या सुरुवातीला लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सामन्यानंतर मोठा वाद झाला होता. त्यावेळी लखनऊ टीमचा मेंटॉर गौतम गंभीर आणि नवीन उल हक विराट कोहलीला भिडले होते.

नवीन बद्दलचा तोच राग प्रेक्षकांच्या मनात आहे. तो मैदानावर दिसला की, क्रिकेटप्रेमींकडून मुद्दामून त्याला डिवचण्यासाठी कोहली, कोहलीच्या घोषणा दिल्या जातात. विराट भारतातील लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. नवीन-उल-हकने थेट त्याच्याशी पंगा घेतला.

रोहितला बाद केल्याच हटके सेलिब्रेशन

मुंबई इंडियन्स विरुद्ध एलिमिनेटर सामन्याच्यावेळी नवीन गोलंदाजीसाठी येताच प्रेक्षकांमधून कोहली, कोहलीच्या घोषणा सुरु झाल्या. मुंबईचा ओपनर रोहित शर्माल बाद करुन त्याने या घोषणा शांत केल्या. नवीन उल हक अफगाणिस्तानातचा क्रिकेटपटू आहे. रोहितला बाद केल्यानंतर नवीनने कानात बोटं घालून नो नॉइज सेलिब्रेशन केलं.

नवीन उल हक काय म्हणाला?

जेव्हा नवीनला या बद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्याने आपण या वातावरणाचा आनंद घेतो, असं त्याने सांगितलं. “कोहली, कोहलीच्या घोषणा ऐकल्या की, आपल्या टीमसाठी अजून चांगली कामगिरी करण्यासाठी मी प्रेरित होतो, मला आवेश चढतो. प्रोफेशनल खेळाडूला अशी परिस्थिती हाताळता आली पाहिजे. बाहेरच्या आवाजामुळे आपल्या खेळावर परिणाम होणार नाही, हे पाहिलं पाहिजे” असं नवीन उल हक म्हणाला.

‘त्यावेळी हेच लोकं तुमच नाव घेतील’

“मी बाहेरच्या आवाजावर लक्ष देत नाही. मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करतो. गर्दीमधून घोषणाबाजी होतेय, कोणी काहीतरी बोलतय त्याचा माझ्यावर परिणाम होत नाही. एखादा दिवस तुम्हाला तुमच्या टीमसाठी सर्वोत्तम कामगिरी करता येणार नाही. पण दुसऱ्यादिवशी तुम्ही तुमच्या टीमसाठी खास कामगिरी करु शकता. त्यावेळी हेच लोकं तुमच नाव घेतील” असं नवीन म्हणाला. नवीन उल हक आयपीएलच्या चालू सीजनमध्ये वादांमुळे चर्चेत राहिला. पण त्याने एकूण 11 विकेट घेतले. मुंबई इंडियन्स विरुद्ध एलिमिनेटरच्या सामन्यात त्याने सर्वाधिक चार विकेट काढले. एलिमिनेटरच्या सामन्यात रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या चार महत्वाच्या फलंदाजांना बाद केलं.

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.