IND vs SL, 2nd Test, Day 1, LIVE Score : पहिला दिवस टीम इंडियाचा, श्रीलंकेची फलंदाजी गडगडली
श्रेयस अय्यर ला त्याचं शतक पूर्ण करण्यात अपयश आलं. डावाच्या 60 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर टीम इंडियाचा डाव संपला. अय्यर 92 धावा करुन आऊट झाला. टीम इंडियाला पहिल्या डावात 252 रन करता आल्या.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. अशा स्थितीत हा सामना जिंकून श्रीलंकेला क्लीन स्वीप करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. उभय संघांमध्ये दुसरी कसोटी डे-नाईट म्हणजेच गुलाबी चेंडूने खेळवली जात आहे. भारतीय संघाची गुलाबी चेंडूची ही चौथी कसोटी आहे. रोहित शर्मा या सामन्याद्वारे कर्णधार म्हणून पहिल्यांदाच पिंक बॉल टेस्ट खेळत आहे.
भारताची Playing 11
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अक्षर पटेल
श्रीलंकेची Playing 11
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुस मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला, सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, प्रवीण जयविक्रमा, विश्वा फर्नांडो
Key Events
बंगळुरुच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं नव्हतं. मात्र, श्रेयस अय्यर यानं शेवटपर्यंत टीम इंडियाचा डाव सावरला. मात्र, 92 धावांवर तो बाद झाला.
बंगळुरुची खेळपट्टी स्पिनर्सला साथ देणारी होती. मात्र, श्रीलंकेच्या गोलंदाजांना जादा फायदा घेता आला नाही.
LIVE Cricket Score & Updates
-
पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर, श्रीलंका बॅकफुटवर
बंगळुरु कसोटीचा पहिला दिवस हा टीम इंडियाच्या नावावर राहिला आहे. पहिल्या दिवशी टीम इंडियानं 252 धावा केल्या. खेळपट्टीकडून मिळणाऱ्या मदतीचा लाभ घेण्यात श्रीलंकन गोलंदाजांना अपयश आलंय. दुसरीकडे, टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अ्यरनं 92 धावा केल्या. श्रीलंकेच्या डावाची सुरुवात देखील खराब झाली. दिवसअखेर त्यांनी 86 धावा केल्या आहेत. त्यांच्या 6 विकेट गेल्या असून जसप्रीत बुमराहनं 3, मोहम्मद शमीनं 2 आणि अक्षर पटेलनं 1 विकेट घेतली.
-
अँजेलो मॅथ्यूजची झुंज संपली, टीम इंडियाला सहावं यश
अँजेलो मॅथ्यूजची झुंज संपली आहे. टीम इंडियाला सहावं यश मिळालं असून त्यानं 43 धावा केल्या आहेत. बुमराहनं हे यश मिळवून दिलं आहे.
-
-
श्रीलंकेला पाचवा धक्का, अक्षर पटेलला पहिलं यश
भारताप्रमाणं श्रीलंकेची देखील खराब सुरुवात झाली आहे. श्रीलंकेनं त्यांची पाचवी विकेट गमावली आहे. ही विकेट अक्षर पटेलनं घेतली. त्यानं चरिथा अलास्काला आऊट केलं.
-
श्रीलंकेला चौथा धक्का, मोहम्मद शमीला दुसरं यश
भारताप्रमाणं श्रीलंकेची देखील खराब सुरुवात झाली आहे. मोहम्मद शमीनं श्रीलंकेच्या धनंजय डी सिल्वाला एलबीडबल्यू आऊट केलं आहे.
-
श्रीलंकेच्या डावाची खराब सुरुवात, 16 धावात 3 विकेट गेल्या
बंगळुरु कसोटीतील श्रीलंकेच्या डावाला निराशाजनक सुरुवात झाली आहे. कुशल मेंडिस पाठोपाठ दुसरा सलामीवीर दिमुथ करुणारत्ने बाद झाला आहे. मोहम्मद शमीनं त्याला आऊट केलं.करुणारत्नेनं चार धावा केल्या आहेत. श्रीलंकेची 3 बाद 16 अशी स्थिती झाली आहे.
-
-
श्रीलंकेची खराब सुरुवात, जसप्रीत बुमराहनं दिले दोन धक्के
बंगळुरु कसोटीतील श्रीलंकेच्या डावाला सुरुवात झाली आहे. कुशल मेंडिस आणि लाहिरु थिरीमाने हे बाद झाले आहेत. जसप्रीत बुमराहनं अप्रतिम गोलंदाजी करत लंकेचे दोन खेळाडू आऊट केले.
-
श्रीलंकेच्या डावाला सुरुवात
बंगळुरु कसोटीतील श्रीलंकेच्या डावाला सुरुवात झाली आहे. कुशल मेंडिस आणि दिुथ करुणारत्ने यांनी श्रीलंकेच्या डावाची सुरुवात केली आहे.
-
श्रेयस अय्यरचं शतक हुकलं
श्रेयस अय्यर ला त्याचं शतक पूर्ण करण्यात अपयश आलं. डावाच्या 60 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर टीम इंडियाचा डाव संपला. अय्यर 92 धावा करुन आऊट झाला. टीम इंडियाला पहिल्या डावात 252 रन करता आल्या.
-
टीम इंडियाच्या 250 धावा पूर्ण, अय्यरची शतकाकडे वाटचाल
टीम इंडियाच्या 250 धावा पूर्ण झाल्या आहेत. तर, श्रेयस अय्यरची शतकाकडे वाटचाल सुरु आहे.
-
अय्यरचा अजून एक षटकार
श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचा डाव सावरला आहे. 54 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर अय्यर षटकार लगवाला आहे. जयविक्रमाच्या बॉलिंगवर अय्यरनं हा शॉट खेळला.
-
भारताला 8 वा धक्का, अक्षर पटेल 9 धावांवर बाद
भारताने 8 वी विकेट गमावली आहे. सुरंगा लकमलने अक्षर पटलेला (9) त्रिफळाचित केलं. (भारत 215/)
-
अक्षरचा षटकार, भारताचं द्विशतक
49 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने लसिथ एम्बुल्डेनियाला शानदार षटकार लगावत 6 धावा वसूल केल्या. यासोबतच धावफलकावर भारताचं द्विशतक झळकलं आहे.
-
श्रेयस अय्यरचे एकाच षटकात दोन षटकार, अर्धशतक पूर्ण
48 व्या षटकात धनंजया डी सिल्वाच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने तिसऱ्या आणि सहाव्या चेंडूवर दोन शानदार षटकार लगावले. यासोबत त्याने 54 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
-
भारताचा 7 वा गडी माघारी, रवी अश्विन 13 धावांवर बाद
भारताने 7 वी विकेट गमावली आहे. धनंजया डी सिल्वाने रवीचंद्रन अश्विनला 13 धावांवर असताना यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाकरवी झेलबाद केलं. (भारत 183/7)
-
भारताचा 5 वा गडी माघारी, ऋषभ 39 धावांवर बाद
एम्बुल्डेनियाने भारताला पाचवा धक्का दिला आहे. त्याने ऋषभ पंतला बाद केले. 33 वे षटक टाकणाऱ्या या डावखुऱ्या फिरकीपटूने चेंडू पंतला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्या फिरकीवर पंत बॅकफूटवर खेळायला गेला आणि बोल्ड झाला. पंतने तुफानी फलंदाजी केली. त्याने 26 चेंडूंत 7 चौकारांसह 39 धावा केल्या.
-
श्रीलंकेला 6 वं यश, रवींद्र जडेजा 4 धावांवर बाद
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताचा सहावा गडी बाद केला आहे. लसिथ एम्बुल्डेनियाने रवींद्र जडेजाला लाहिरु तिरुमानेकरवी झेलबाद केलं. जडेजाने 4 धावांचं योगदान दिलं. (भारत 148/6)
-
पहिलं सत्र श्रीलंकेच्या नावावर, भारताची 4 बाद 93 अशी बिकट परिस्थिती
पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. भारताच्या चार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवल्याने हे सत्र श्रीलंकेच्या नावावर आहे. या सत्रात भारताने केवळ धावा जोडल्या त्या बदल्यात रोहित शर्मा, विराट कोहली, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी या फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या आहे. सध्या ऋषभ पंत (16) आणि श्रेयस अय्यर (1) खेळत आहेत.
-
भारताला चौथा धक्का, विराट कोहली 23 धावांवर बाद
भारताने चौथी विकेट गमावली आहे. 28 व्या षटकात धनंजया डी सिल्वाने विराट कोहलीना पायचित पकडलं. त्याने 23 धावांचं योगदान दिलं. (भारत 86/4)
-
श्रीलंकेला तिसरं यश, हनुमा विहारी 31 धावा करुन माघारी
श्रीलंकेला तिसरं यश मिळालं आहे. प्रवीण जयविक्रमाने हनुमा विहारीला 31 धावांवर असताना यष्टीरक्षख निरोशन डिकवेलाकरवी झेलबाद केलं. (भारत 76/3)
-
भारताला दुसरा धक्का, रोहित शर्मा 15 धावांवर बाद
भारताने दुसरी विकेट गमावली आहे. 10 व्या षटकात लसिथ एम्बुल्डेनियाने रोहित शर्माला त्रिफळाचित केलं. (भारत 29/2)
-
रोहित शर्माचा षटकार
विश्वा फर्नांडोने सहाव्या षटकात गोलंदाजी केली आणि या षटकात 8 धावा दिल्या. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रोहितने डीप मिड-विकेटवर षटकार ठोकला.
-
मयंक अग्रवाल बाद
विश्वा फर्नांडोने दुसरे षटक टाकले. या षटकात मयंक अग्रवाल धावबाद झाला. ओव्हरचा चौथा चेंडू मयंकच्या पॅडला लागला पण अंपायरने LDW दिले नाही. मयंक धाव घेण्यासाठी पळू लागला पण रोहितने त्याला माघारी पाठवले. दरम्यान, जयविकर्माने त्याला पॉईंटवरून धावचित केलं. त्याने चार धावांचं योगदान दिलं. (भारत 10/1)
-
भारताची Playing 11
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अक्षर पटेल
-
नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
#INDvsSL 2nd Test | Indian win the toss and opt to bat first against Sri Lanka at M Chinnaswamy Stadium, Bengaluru.
The hosts are leading the 2-match series 1-0.
(Pic: BCCI’s Twitter account) pic.twitter.com/kTNlJmtrd0
— ANI (@ANI) March 12, 2022
Published On - Mar 12,2022 2:27 PM