AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ 1st ODI: CSK चा स्टार बॅट्समन वनडे सीरीजमध्ये टीम इंडियावर पडू शकतो भारी

India vs New Zealand: न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाला एका स्टार प्लेयरपासून सावध राहण्याती आवश्यकता आहे. हा बॅट्समन कधीही मॅच फिरवू शकतो.

IND vs NZ 1st ODI: CSK चा स्टार बॅट्समन वनडे सीरीजमध्ये टीम इंडियावर पडू शकतो भारी
Team indiaImage Credit source: BCCI
| Updated on: Jan 18, 2023 | 12:39 PM
Share

India vs New Zealand 1st ODI: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये तीन वनडे सामन्यांच्या सीरीजमधील पहिला सामना आज होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्ध क्लीन स्वीप केल्यानंतर टीम इंडियाची नजर आता न्यूझीलंड विरुद्ध सीरीज जिंकण्यावर असेल. टीम इंडियाच्या बॉलर्सना किवी टीमच्या एका स्टार बॅट्समनपासून सावध राहण्याची गरज आहे. न्यूझीलंडचा हा प्लेयर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. सीएसकेची कॅप्टनशिप एमएस धोनीकडे आहे. या खेळाडूबद्दल जाणून घेऊया.

‘मॅन ऑफ द सीरीज’चा मानकरी

न्यूझीलंडचा स्टार बॅट्समन डेवोन कॉन्वे शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने पाकिस्तान दौऱ्यावर धावांचा पाऊस पाडला होता. त्याच्यामुळे न्यूझीलंड टीमने पाकिस्तान विरुद्ध वनडे सीरीज 2-1 अशी जिंकली. पाकिस्तान विरुद्ध दुसऱ्या वनडे मॅचमध्ये कॉन्वेने तुफानी शतक झळकावलं. त्याने 92 चेंडूत 101 धावा फटकावल्या. तिसऱ्या वनडेत 65 धावांची शतकी खेळी केली. याच प्रदर्शनामुळे तो ‘मॅन ऑफ द सीरीज’चा मानकरी ठरला.

IPL मध्ये कशी आहे कामगिरी?

IPL मध्ये डेवोन कॉन्वे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. कॉन्वेने सीएसके फॅन्सच्या मनात आपलं एक वेगळ स्थान निर्माण केलय. IPL 2022 मध्ये तो सीएसकेसाठी अनेक लाजवाब इनिंग खेळलाय. आयपीएल 2022 मध्ये त्याने 7 सामन्यात 252 धावा फटकावल्यात. यात 87 सर्वश्रेष्ठ स्कोर आहे. कॉन्वेने न्यूझीलंडकडून खेळताना 15 वनडे मॅचेसमध्ये 578 धावा केल्या आहेत. यात 2 सेंच्युरी आहेत. तो स्फोटक फलंदाजीमध्ये माहिर आहे,. टीम इंडियाला सावध रहाव लागेल

भारतीय बॉलर्सना डेवोन कॉन्वेला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करावा लागेल. वनडे सीरीजमध्ये तो टीम इंडियासाठी सर्वात मोठा धोका आहे. कॉन्वे याआधी भारतीय पीचेसवर खेळला आहे. त्याला इथल्या परिस्थितीचा चांगला अंदाज आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.