Cricket : दारूचा नाद लय वाईट, ‘या’ दिग्गज खेळाडूचं करिअर बर्बाद, IPL मध्येही होती दहशत!
काही खेळाडूंना नशिबाची साथ मिळते आणि कमी वेळातच त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळते. परंतु काही वाईट सवयींमुळे अशा अनेक खेळाडूंचं बर्बाद होतं. असाच एक खेळाडू आहे. ज्याने क्रिकेट विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आता तो खेळाडू गायबच झाला आहे.
मुंबई : प्रत्येक खेळाडूचं आपल्या देशासाठी खेळण्याचं स्वप्न असतं. मात्र सर्वांचंच ते पूर्ण होतं असं नाही. कारण कित्येकांचं फक्त स्वप्नच राहून जातं. काही खेळाडूंना नशिबाची साथ मिळते आणि कमी वेळातच त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळते. परंतु काही वाईट सवयींमुळे अशा अनेक खेळाडूंचं बर्बादही झालं आहे. असाच एक खेळाडू आहे. ज्याने क्रिकेट विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आता तो खेळाडू गायबच झाला आहे.
कोण आहे तो खेळाडू?
हा खेळाडू न्यूझीलंड संघाचा असून त्याने कॉमामधून बाहेर आल्यानंतर शतक ठोकलं होतं. त्यामुळे हा खेळाडू सर्वांच्या चांगलाच लक्षात राहिला. आयपीएलमध्येही पुणे वॉरियर्स संघाकडून तो खेळला होता. पॉवर प्लेमध्ये तो चांगलीच धुलाई करायचा.
वयाच्या 14 व्या वर्षी त्याला वडिल सोडून गेले होते. एकटाच तो लहानाचा मोठा झाला. या खेळाडूचेस वडीलही क्लब क्रिकेटर होते. या खेळाडूने आपल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय संघात जागा मिळवली. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये या खेळाडूने संघात आपली जागा मिळवली होती. मात्र त्याला दारूची वाईट सवय लागली होती. हीच सवय त्याला पुढे महागात पडली, 2013 साली क्राइस्ट चर्च बाहेर त्याची कोणासोबत भांडणे झालीत. यावेळी त्याला इतकी मारहाण करण्यात आली की तो कॉमामध्ये गेलेला.
जवळपास 56 तास तो कॉमामध्ये होता त्यानंतर त्याने कमबॅख करताना तुफानी शतक करत पुन्हा एकदा क्रिकेट विश्वाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. हा योद्धा खेळाडू म्हणजे न्यूझीलंड संघाचा ऑल राऊंडर खेळाडू जेसी रायडर आहे.
2014 साली कमबॅक केल्यावर परत एकदा वादात सापडला. भारत दौऱ्यावर जाताना नियमांचं पालन न केल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आलं. त्यानंतर 2015 च्या वन डे वर्ल्ड कपमध्येही त्याचं नाव जवपास पक्क होतं. मात्र त्याने न्यूझीलंड ए संघासोबत युएईमध्ये जाण्यास नकार दिला त्यामुळे त्याला वनडे वर्ल्ड कपमधूनही वगळण्यात आलं.
दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये तो इंडियन कॅपिटल्सकडून खेळला आणि त्यानंतर अनेक वर्षांनी चाहत्यांनी त्याला पाहिलं होतं. जेसी रायडरला दारूचं व्यसन आणि इतर वाईट सवयी करिअर बर्बाद होण्याला कारणीभूत ठरल्या.