IND vs NZ : न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या पराभवानंतर टीम इंडियाला तगडा धक्का, काय झालं?

India vs New Zealand 1st Test : पाहुण्या न्यूझीलंडने यजमान भारताला बंगळुरु कसोटीत 8 विकेट्सने पराभूत करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पराभवानंतर टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे.

IND vs NZ : न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या पराभवानंतर टीम इंडियाला तगडा धक्का, काय झालं?
team india rohit virat jadejaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 1:36 PM

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे.पावसामुळे पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया गेल्यानंतरही पाचव्या दिवसातील पहिल्या सत्रात सामन्याचा निकाल लागला. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं 107 धावांचं आव्हान हे न्यूझीलंडने 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. न्यूझीलंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर टीम इंडियाला हा पराभव चांगला महागात पडला आहे. भारताला पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्स टेबलमध्ये नुकसान झालं आहे.त्यामुळे अंतिम फेरीत पोहचण्याचा मार्ग अवघड झाला आहे.

टीम इंडियाचं किती नुकसान?

टीम इंडियाची विजयी टक्केवारी या मालिकेआधी ही 74.24 अशी होती. मात्र या पराभवासह टीम इंडियाच्या विजयी टक्केवारीत मोठी घट झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार टीम इंडियाची विजयी टक्केवारी ही 68.05 अशी झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची ही तिसरी साखळी फेरी 2023 ते 2025 पर्यंत होणार आहे. टीम इंडियाने या तिसऱ्या साखळीत आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले आहेत. त्यापैकी 8 वेळा टीम इंडियाने विजय मिळवलाय. तर 3 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 1 सामना हा अनिर्णित राहिलाय. तर ऑस्ट्रेलिया 62.50 टक्केवारीसह दुसर्‍या क्रमांकावर विराजमान आहे.

हे सुद्धा वाचा

असा झाला सामना

टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाचा पहिल्या डावात 46 धावांवर बाजार उठला. न्यूझीलंडने या प्रत्युत्तरात 402 धावा केल्या. तर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 462 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचं आव्हान मिळालं. न्यूझीलंडने हे आव्हान 2 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं आणि 36 वर्षांनी भारतात विजय मिळवला.

अव्वव स्थान कायम, पण विजयी टक्केवारीत घट

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.

Non Stop LIVE Update
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्...
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्....
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट.
हे षड्यंत्र...राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? संजय राऊतांची टीका
हे षड्यंत्र...राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? संजय राऊतांची टीका.
औकातीपेक्षा जास्त भेटल्यावर..,ठाकरे गटाच्या नेत्याचा शिरसाटांवर निशाणा
औकातीपेक्षा जास्त भेटल्यावर..,ठाकरे गटाच्या नेत्याचा शिरसाटांवर निशाणा.
तिढा सुटला? अमित शाहांनी ठरवला फॉर्म्युला, कोणाच्या वाटेला किती जागा?
तिढा सुटला? अमित शाहांनी ठरवला फॉर्म्युला, कोणाच्या वाटेला किती जागा?.
यंदा विधानसभेत शिंदे-ठाकरे-मनसे अशा 3 'सेनां'मध्ये रंगणार मुकाबला
यंदा विधानसभेत शिंदे-ठाकरे-मनसे अशा 3 'सेनां'मध्ये रंगणार मुकाबला.
विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत प्लॅन
विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत प्लॅन.
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक.
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात.
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु.