DC vs MI 2023 : ‘त्याला कोणी सांगितल नाहीय, कि तू….’ वॉर्नरच्या संबंधीच्या प्रश्नावर Axar Patel च रोखठोक उत्तर

DC vs MI IPL 2023 : Mumbai Indians कडून पराभव झाल्यानंतर दिल्लीच्या टीममध्ये उडाला असंतोषाचा भडका. सलग चार पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.

DC vs MI 2023 : 'त्याला कोणी सांगितल नाहीय, कि तू....' वॉर्नरच्या संबंधीच्या प्रश्नावर Axar Patel च रोखठोक उत्तर
david warner-axar patel
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 12:47 PM

DC vs MI IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सचा काल मुंबई इंडियन्सने पराभव केला. IPL 2023 च्या सीजनमधील दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग चौथा पराभव आहे. दिल्लीच्या टीमने काल पहिली बॅटिंग करताना 172 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर विजयी लक्ष्य गाठलं. दिल्लीचा घरच्या मैदानात पराभव झाला. दिल्लीचा कॅप्टन डेविड वॉ़र्नर अर्धशतकी खेळी केली. पण त्याचा स्ट्राइर रेट खूप धीमा होता. ज्याचा टीमला फटका बसला. दिल्लीकडून अक्षर पटेलने आक्रमक फटकेबाजी केली. त्यामुळे दिल्लीच्या टीमला 170 धावांची वेस ओलांडता आली.

अक्षर पटेल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दिल्लीसाठीच नाही, टीम इंडियाकडूनही तो काही महत्वपूर्ण इनिंग खेळलाय. टीम इंडियाच्या विजयातही त्याने महत्वपूर्णय योगदान दिलय. दिवसेंदिवस त्याच्या खेळात सुधारणा होतेय.

वॉर्नर आणि अक्षरमधला फरक

अक्षर पटेल आणि डेविड वॉर्नरने 6.2 ओव्हरमध्ये 67 धावांची भागीदारी केली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्स विरुद्ध सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. वॉर्नरला आपला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 43 चेंडू लागले. तेच अक्षरने 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यात चार फोर आणि 5 सिक्स होते.

अक्षर वॉर्नरबद्दल काय म्हणाला?

“डाव संभाळायला, डावाला आकार द्यायला, त्याला कोणीही सांगितलेलं नाही” असं अक्षरने मॅचनंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं. “मागच्या दोन सामन्यात त्याने हिटिंग करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला जमलं नाही. एक बॅट्समन म्हणून तो त्या क्षणाला काय विचार करत होता, मला माहित नाही. एकामागोमाग एक विकेट जात असताना आक्रमक बॅटिंग करणं योग्य नाही. तो फटकेबाजीचा प्रयत्न करत होता, पण त्याला जमत नव्हतं. रिकी पॉन्टिंग, शेन वॅटसन, सौरव गांगुलीने वॉर्नरसोबत चर्चा केली. त्याच्या स्ट्राइक रेटचा सुद्धा विषय झाला. त्यांनी वॉर्नरचे व्हिडिओ बघितले. तो स्वत: त्यावर मेहनत घेतोय” असं अक्षरने सांगितलं. सकारात्मकता आवश्यक

“जय-पराजयाने फरक पडत नाही. पण आम्ही, या स्थितीत निराश झालो. आम्ही चार मॅच हरलोय. रन रेट चांगला नाहीय. क्वालिफिकेशनच काय होणार? हा जास्त विचार केला, तर परिस्थिती आणखी खराब होईल. ज्या प्रदर्शनाची गरज आहे, तसं प्रदर्शन करता येणार नाही. त्यामुळे तुमची भूमिका सकारात्मक असली पाहिजे” असं अक्षर म्हणाला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.