T 20 Blast: अविश्वसनीय! कौतुकाचे शब्द कमी पडतील, इतका जबरदस्त कॅच, भावा हा VIDEO बघच
क्रिकेटच्या (Cricket) मैदानावर अनेकदा आपण क्षेत्ररक्षकांना थक्क करुन सोडणारे झेल (Catch) पकडताना पाहतो. त्यावेळी आपल्याला वाटतं की, यापेक्षा अजून सर्वोत्कृष्ट काय असू शकतं?
मुंबई: क्रिकेटच्या (Cricket) मैदानावर अनेकदा आपण क्षेत्ररक्षकांना थक्क करुन सोडणारे झेल (Catch) पकडताना पाहतो. त्यावेळी आपल्याला वाटतं की, यापेक्षा अजून सर्वोत्कृष्ट काय असू शकतं? पण त्यानंतर आपण त्यापेक्षाही वेगळ काहीतरी पाहतो, जे पूर्णपणे हटके असतं. आधी पाहिलेल्या कॅच पेक्षा तो झेल आपल्याला जास्त जबरदस्त वाटतो. बुधवारी रात्री T 20 ब्लास्टमध्येही हेच पहायला मिळालं. नॉर्थेम्प्टनशरचा खेळाडू रॉब क्यॉफने (Rob Keogh) बाउंड्रीवर जबरदस्त झेल पकडला. 30 वर्षाच्या रॉबने घेतलेला हा 32 वा झेल आहे. तुम्ही जेव्हा त्याचा हा झेल बघाल, त्यावेळी त्याने आधी घेतलेले 31 कॅच विसरुन जाल. त्याने पकडलेली 32 वी कॅच तितकीच कमालीची होती. लिसेस्टशरच्या इनिंमध्ये 12 वी ओव्हर सुरु असताना नॉर्थेम्प्टनशरचा खेळाडू रॉब क्यॉफने हा झेल घेतला. क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं.
रॉबला सुद्धा आपण असा झेल घेऊ असं वाटलं नसेल
रॉब क्यॉफने लिसेस्टशरचा फलंदाज ऋषी पटेलचा झेल घेतला. त्याने सीमारेषेवर ज्या पद्धतीने हा झेल घेतला, ते कमालीचं होतं. पहिल्यांदा रॉबला सुद्धा आपण असा झेल घेऊ असं वाटलं नसेल. पण त्यानंतर त्याने अचानक झेप घेतली व एका ऐतिहासिक कॅचची नोंद झाली.
No way. No way. You cannot do that ??? ?????! ? https://t.co/ns49URWb9N pic.twitter.com/MVd7EynjiK
— Northamptonshire Steelbacks (@NorthantsCCC) June 1, 2022
लिसेस्टशरच्या डावात 12 व्या ओव्हरमधील घटना
हेल्डरिचच्या गोलंदाजीवर रॉब क्यॉफने 12 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर हा झेल पकडला. जेव्हा त्याने हा झेल घेतला, तेव्हा ऋषी पटेल फक्त 10 धावांवर खेळत होता. हेल्डरिचच्या खात्यात या विकेटची नोंद झाली. त्याने 4 षटकात 42 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. नॉर्थेम्प्टनशरने लिसेस्टशर विरुद्धचा हा सामना 42 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना नॉर्थेम्प्टनशरने लिसेस्टशर समोर 228 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण लिसेस्टशरला फक्त 189 धावा करता आल्या. नॉर्थेम्प्टनशरकडून क्रिस लिनने शतक ठोकलं. क्रिकेटच्या मैदानात फक्त आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येच नव्हे, तर स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये सुद्धा जबरदस्त झेल घेतले जातात. हेच या सामन्यातून दिसून आलं.