NZ vs AUS 2nd T20i | एडम झॅम्पासमोर न्यूझीलंड ढेर, ऑस्ट्रेलियाने सामन्यासह मालिका जिंकली
New Zeland vs Australia 2nd T20i Match Highlights In Marathi | ऑस्ट्रेलियाने यजमान न्यूझीलंडचा दुसऱ्या टी 20 सामन्यात 72 धावांनी धुव्वा उडवत मालिका जिंकली आहे.
ऑकलँड | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने यजमान न्यूझीलंडचा दुसऱ्या टी 20 सामन्यात 72 धावांनी धुव्वा उडवला आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा बाजार अवघ्या 17 ओव्हरमध्ये 102 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. एडम झॅम्पा हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. झॅम्पाने 4 विकेट्स घेत न्यूझीलंडचं पॅकअप केलं.
ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला सुरुवातीपासूनच झटके दिले. त्यामुळे न्यूझीलंडला कुठेच कमबॅकसाठी संधी मिळाली नाही. न्यूझीलंडची 16.6 ओव्हरमध्ये 9 बाद 102 अशी स्थिती झाली. तर डेव्हॉन कॉनव्हे हा दुखापतीमुळे बॅटिंग करु शकला नाही. अशाप्रकारे न्यूझीलंड 102 धावांवर ऑलआऊट झाली.
न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स याने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. जोस क्लार्कसन आणि ट्रेन्ट बोल्ट या दोघांनी अनुक्रमे 10 आणि 16 धावा केल्या. न्यूझीलंडच्या 6 खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आा नाही. तर एडम मिल्ने आला तसाच झिरोवर माघारी परतला. तर ऑस्ट्रेलियाकडून एडम झॅम्पा याने 4 ओव्हरमध्ये 34 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. नॅथन एलिसने 2 विकेट्स मिळवल्या. तर कॅप्टन मिचेल मार्श, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स या तिघांना 1-1 विकेट मिळाली.
तर त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाने 19.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 174 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ओपनर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक 45 रन्स केल्या. कॅप्टन मिचेल मार्श याने 26, पॅट कमिन्स याने 28, टीम डेव्हिड 17 आणि नॅथन एलिस याने 11* धावा केल्या. तर इतरांना विशेष काही करता आलं नाही. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्यूसन याने 4 विकेट्स घेतल्या. बेन सियर्स, एडन मिल्ने आणि कॅप्टन सँटनर दोघांनी 2-2 विकेट्स मिळवल्या.
दरम्यान मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना हा रविवारी 25 फेब्रुवारीला होणार आहे. न्यूझीलंडचा हा सामना जिंकून लाज राखण्याचा प्रयत्न असणार आहे.
ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली
Another dominant performance from Australia!
And with this win, they have taken an unassailable series lead of 2-0 💪#NZvAUS | 📝: https://t.co/3YiKQDqaW3 pic.twitter.com/O44t27DNUU
— ICC (@ICC) February 23, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, ॲडम झॅम्पा आणि जोश हेझलवूड.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | मिचेल सँटनर (कर्णधार), फिन एलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), विल यंग, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, ॲडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट आणि बेन सियर्स.