NZ vs PAK : टीम सायफर्टची तोडफोड बॅटिंग, न्यूझीलंडने 60 चेंडूतच जिंकला सामना, पाकिस्तानचा 8 विकेट्सने धुव्वा
New Zealand vs Pakistan, 5th T20I Match Result : यजमान न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पाचवा आणि शेवटचा टी 20i सामना वेलिंग्टनमधील स्काय स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. न्यूझीलंडने या सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला.

न्यूझीलंड क्रिकेट टीमने पाचव्या अणि अंतिम टी 20I सामन्यात पाकिस्तानचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला विजयासाठी 129 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान अवघ्या 10 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. न्यूझीलंडने 60 बॉलमध्ये 131 रन्स केल्या. टीम सायफर्ट हा न्यूझीलंडच्या विजयाचा हिरो ठरला. सायफर्टने 97 धावांची नाबाद खेळी केली. तर फिन एलन याने 27 रन्सचं योगदान दिलं. न्यूझीलंडने यासह 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली.
न्यूझीलंडचा एकतर्फी विजय
त्याआधी न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 128 धावाच करता आल्या. न्यूझीलंडकडून 129 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम सायफर्ट आणि फिन एलन सलामी जोडी मैदानात आली. या सलामी जोडीने 6.2 ओव्हरमध्ये 93 धावांची भागीदारी केली. त्यानंतर फिन एलन 12 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 5 फोरसह 27 रन्स करुन आऊट झाला.
त्यानंतर मार्क चॅपमॅन मैदानात आला. न्यूझीलंडने 10 धावांनंतर दुसरी विकेट गमावली. मार्क चॅपमॅन 3 रन्स करुन माघारी परतला. मात्र टीम सायफर्ट आणि डॅरेल मिचेल या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 28 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप करत न्यूझीलंडला एकतर्फी विजय मिळवून दिला. डॅरेलने 4 बॉलमध्ये नॉट आऊट 2 रन्स केल्या. तर टीम सायफर्टने 255.26 च्या स्ट्राईक रेटने 38 चेंडूत नाबाद 97 रन्स केल्या. सायफर्टने या दरम्यान 10 षटकार आणि 6 चौकार लगावले.
पाकिस्तानची बॅटिंग
न्यूझीलंडने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. कॅप्टन सलमान आघा याने सर्वाधिक धावा केल्या. सलमानने 51 रन्स केल्या. शादाब खानने 28 रन्स केल्या. तर मोहम्मद हारिसने 11 रन्स केल्या. तर इतरांनी न्यूझीलंडसमोर गुडघे टेकले. न्यूझीलंडकडून जेम्स निशाम याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. जेकब डफी याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर बेन सियर्स आणि इश सोढी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
न्यूझीलंडचा विजयी चौकार, पाकिस्तानवर 8 विकेट्सने मात
Finishing the KFC T20I series with a bang! Tim Seifert (97*) finishes off a clinical all-round performance as the BLACKCAPS win the series 4-1. Catch up on the scores | https://t.co/TZTAt6S23R 📲 #NZvPAK #cricketnation pic.twitter.com/P96yGhh8oy
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 26, 2025
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), टिम सेफर्ट, फिन अॅलन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल हे (विकेटकीपर), ईश सोधी, जेकब डफी, बेन सियर्स आणि विल्यम ओरुर्क.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद हरिस (विकेटकीपर), हसन नवाज, सलमान आघा (कर्णधार), ओमैर युसूफ, उस्मान खान, शादाब खान, अब्दुल समद, जहांदाद खान, हरिस रौफ, सुफियान मुकीम आणि मोहम्मद अली.