NZ vs PAK | पावसाची पाकिस्तानच्या बाजूने बॅटिंग, न्यूझीलंडवर 21 धावांनी मात, फखरंच निर्णायक शतक
Pakistan win by 21 runs Against New Zealand | फखर झमान याने केलेल्या झंझावाती खेळीमुळे पाकिस्तान डीएलएसच्या नियमांनुसार पुढे होती. त्यामुळे पाकिस्तानने सहज विजय मिळवला.
बंगळुरु | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 35 व्या सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडवर 21 धावांनी विजय मिळवला आहे. पाकिस्तानचा हा वर्ल्ड कपमधील चौथा विजय ठरला आहे. पाकिस्तानच्या विजयात फखर झमान याने ठोकलेलं वेगवान शतक हे निर्णायक ठरलं. पाकिस्तानने या विजयासह सेमी फायनलमधील शर्यतीतील आव्हान कायम राखलं आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचा हा सलग चौथा पराभव ठरला आहे. या पराभवामुळे न्यूझीलंडचं सेमी फायनलचं समीकरण आणखी बिघडलंय. त्यामुळे आता पुढील काही दिवसात सेमी फायनलसाठी चांगलीच चुरस आणि रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
सामन्याचा धावता आढावा
पाकिस्तानने टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय घेतला. रचिन रविंद्र याच्या 108 आणि कॅप्टन केन विलियमसन याच्या 95 धावांच्या मदतीने न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 401 धावा केल्या. पाकिस्तानला विजयासाठी 402 धावांचं खडतर आव्हान मिळालं. पाकिस्तानकडून फखर झमान आणि अब्दुल्लाह शफीक सलामी जोडी मैदानात आली. शफीक 4 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर फखर आणि कॅप्टन बाबर आझम या दोघांनी जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे 21.3 ओव्हरपर्यंत पाकिस्तानचा 1 बाद 160 धावा अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर सामन्यात पहिल्यांदा पावसाने एन्ट्री घेतली. सामना थांबवण्यात आला.
पहिल्यांदा पाऊस आला तेव्हा पाकिस्तान डीएलएस नियमानुसार सामन्यात 10 धावांनी पुढे होती. पावसाने विश्रांती घेतली. खेळ पुन्हा सुरु झाला. मात्र त्यानंतर पावसाने दुसऱ्यांदा एन्ट्री घेतली. खेळ पुन्हा थांबवण्यात आला. मात्र तोवर पाकिस्तानने 200 धावांपर्यंत मजल मारलेली. तसेच पाकिस्तान डीएसनुसार 21 धावांनी आघाडी घेतलेली. पावसामुळे सामना पुन्हा सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आलं.
पावसामुळे न्यूझीलंडला फटका
Pakistan win by 21 runs on DLS
A @FakharZamanLive masterclass for the ages as Pakistan bag two points! #NZvPAK | #CWC23 | #DattKePakistani pic.twitter.com/1SGycfJs0V
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 4, 2023
पाकिस्तानकडून फखर झमान याने सर्वाधिक 81 बॉलमध्ये 8 चौकार आणि 11 सिक्सच्या मदतीने नाबाद 126 धावा केल्या. तर बाबर आझम याने 63 बॉलमध्ये नाबाद 66 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊथी याने एकमेव विकेट घेतली.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोढी, टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रौफ.