स्टार क्रिकेटरला दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून डच्चू, टीमला मोठा धक्का

संजू सॅमसनला (Sanju Samson) मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. संजूला कॅच पकडताना गुडघ्याला दुखापत झाली.

स्टार क्रिकेटरला दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून डच्चू, टीमला मोठा धक्का
sanju samson
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 5:36 PM

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी 20 मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे गुरुवार 5 जानेवारीला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलंय. दुसऱ्या सामन्याच्या 24 तासांआधी टीम इंडियाच्या संजू सॅमसनला दुखापतीमुळे टी 20 मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकावं लागलं. त्यानंतर आता आणखी एक खेळाडूला दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. (nz vs pak shadab khan will miss upcoming 3 match odi series against new zealand due to sustaining a finger injur)

न्यूझीलंड सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. उभयसंघात कसोटीनंतर एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. या मालिकेसाठी उपकर्णधार आणि ऑलराउंडर शादाब खानला दुखापतीमुळे संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे शादाबला दुखापत चांगलीच महागात पडलीय. शादाबला बिग बॅश लीगमध्ये बोटाला दुखापत झाली होती. शादाबची ती दुखापत अजूनही बरी झालेली नाही.

हे सुद्धा वाचा

शादाबाऐवजी पाकिस्तान टीममध्ये स्पिनर उसामा मीरला पहिल्यांदा संधी देण्यात आली आहे. उसामाने नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान कपमध्ये सर्वाधिक 28 विकेट्स घेतल्या होत्या, ज्यात 2 सामन्यातील वेगवेगळ्या डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

संजू सॅमसन टी 20 मालिकेतून बाहेर

संजूला मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. संजूला कॅच पकडताना गुडघ्याला दुखापत झाली. संजूला या दुखापतीमुळे टीम इंडियासोबत दुसऱ्या सामन्यासाठी पुण्यालाही जाता आलं नाही. टीम इंडियात हा बदल दुसऱ्या सामन्याच्या 24 तासांआधीच घेण्यात आला आहे. संजूच्या जागी अमरावतीच्या विकेटकीपर बॅट्समन जितेश शर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिसजसाठी टीम पाकिस्तान | बाबर आजम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमा, हारिस रऊफ, हारिस सोहेल, इमाम उल हक, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, आगा सलमान, शाहनवाज दहानी, शान मसूद, तय्यब ताहिर आणि उसामा मीर.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.