World cup 2023 ENG vs BAN | आज इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश, टॉस कोणी जिंकला?
World cup 2023 ENG vs BAN | इंग्लंडला या स्पर्धेत कमबॅकसाठी बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच एक वाद झालाय.

धरमशाळा : वर्ल्ड कपमध्ये आज दोन सामने आहेत. इंग्लंड आणि बांग्लादेशची टीम आमने सामने आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने निराशाजनक सुरुवात केली आहे. वर्ल्ड कपच्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने इंग्लंडवर 9 विकेट राखून विजय मिळवला. इंग्लंडसमोर आता धरमशाळा येथील वातावरणाशी जुळवून घ्यायच आव्हान असेल. अहमदाबादच्या उष्ण वातावरणातून ते आता तुलनेने थंड अशा हिमाचल प्रदेशमध्ये खेळणार आहेत. इथलं वातावरण इंग्लंड टीमला अनुकूल आहे. अहमदाबादमध्ये तापमान 35 डिग्री सेल्सियस होतं. तेच धरमशाळामध्ये तापमना 24 डिग्रीच्या आसपास असेल.
बांग्लादेशने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इंग्लंड टीमची बॅटिग सुरु आहे. इंग्लंडला या स्पर्धेत कमबॅकसाठी बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच एक वाद झालाय. “धर्मशाळा मैदानाची आउटफिल्ड खराब आहे. त्यामुळे मैदानावर चेंडू अडवण्यासाठी उड्या मारताना विचार करावा लागणार आहे. जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा कोणताच विचार करत नाही. प्रत्येक धाव वाचवण्यासाठी धडपड करत असतो. पण धर्मशाळा मैदानाची आउटफिल्ड तितकी चांगली नाही” असं जोस बटलर म्हणाला. भारताचा या मैदानावर 22 ऑक्टोबरला सामना होणार आहे. हा सामना न्यूझीलंड सोबत होणार आहे.
इंग्लंडचा संघ : जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, मोईन अली, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड, बेन स्टोक्स, गस ऍटकिन्सन, डेव्हिड विली, रीस टोपली बांग्लादेशची टीम : शाकीब अल हसन (कॅप्टन), लिट्टन दास, नजमुल होसेन शांतो, तानझीद हसन, तौहीद, महमदुल्लाह रियाद, मुशाफिकूर रहिम, मेहेंदी हसन, तंझीम साकीब, नासुम अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, तस्कीन अहमद, मुस्तफीझूर रहमान