One World One Family Cup | युसूफच्या बॉलिंगवर इरफानचा सिक्स, सचिनची टीम युवराजच्या संघाविरुद्ध 4 विकेट्सने विजयी
One World vs One Family Match Highlights | सचिन तेंडुलकर याच्या वन वर्ल्ड टीमने वन फॅमिलीचा 4 विके्टसने धुव्वा उडवत विजय मिळवला आहे.

बंगळुरु | वन वर्ल्ड क्रिकेट टीमेन सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वात युवराज सिंहच्या वन फॅमिली टीमवर 6 विकेट्सने विजय मिळवल आहे. कर्नाटकातील मुद्देनहल्ली येथील सत्य साई ग्राममध्ये वन वर्ल्ड वन फॅमिली कप 2024 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. हा एका चॅरीटी सामना होतं. या सामन्यात वन फॅमिली टीमने वन वर्ल्ड क्रिकेट टीमला विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान वन वर्ल्ड टीमने 6 विकेट्स गमावून 19.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. इरफान पठाण याने मोठा भाऊ यूसुफ पठाण याच्या बॉलिंगवर सिक्स ठोकून टीमला विजयी केलं.
अल्विरो पीटरसन हा वन वर्ल्ड टीमच्या विजयाचा शिल्पकार ठरला. अल्विरो पीटरसन याने वन वर्ल्डसाठी 50 बॉलमध्ये सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. तर नमन ओझा याने 25, कॅप्टन सचिन तेंडुलकर याने 27, उपुल थरंगा याने 29 धावा केल्या. एस बद्रीनाथ आणि हरभजन सिंह दोघेही प्रत्येकी 4 धावांवर आऊट झाले. तर इरफान पठाण आणि अंजता मेंडीस ही जोडी नाबाद परतली. इरफानने नाबाद 12 धावा केल्या. तर मेंडीस झिरोवर नाबाद राहिला.
वन फॅमिली टीमकडून चामिंडा वास याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जेसन क्रेजा, मुथय्या मुरथीथरन आणि युवराज सिंह या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. त्याआधी टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या वन फॅमिलीने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. वन फॅमिलीकडून मॅडी याने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर युसूफ 38, युवराज 23 आणि कलुवथिराणा याने 22 धावांचा योगदान दिलं. तर वन वर्ल्ड कडून हरभजन सिंह याने 2 विकेट्स घेतल्या. तर सचिन, पानेसर आणि अशोक दिंडा या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
वन वर्ल्ड टीम | सचिन तेंदुलकर (कॅप्टन), नमन ओझा, उपुल थरंगा, अल्विरो पीटरसन, सुब्रमण्यम बद्रीनाथ, इरफान पठान, अशोक डिंडा, अजंता मेंडिस, हरभजन सिंह, मोंटी पनेसर, आरपी सिंह आणि डैनी मॉरिसन.
वन फॅमिली टीम | युवराज सिंह (कर्णधार), पार्थिव पटेल, मोहम्मद कैफ, डैरेन मैडी, आलोक कपाली, रोमेश कालूविथराना, यूसुफ पठान, जेसन क्रेजा, मुथैय्या मुरलीधरन, मखाया एंटिनी, चामिंडा वास आणि वेंकटेश प्रसाद.