Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs ENG : बाबर आझमला विसरा! कामरान गुलामचं पहिल्या कसोटी सामन्यातच शतक

Pakistan vs England, 2nd Test: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना मुल्तानमध्ये सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी पाकिस्तानची पकड दिसली. खासकरून पदार्पणाच्या सामन्यात कामरानने जबरदस्त खेळी केली. तसेच पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं. विशेष म्हणजे कामरानला बाबर आझमच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

PAK vs ENG : बाबर आझमला विसरा! कामरान गुलामचं पहिल्या कसोटी सामन्यातच शतक
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 6:49 PM

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कोसटी सामना सुरु आहे. दुसऱ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अब्दुल्ला शफीक आणि कर्णधार शान मसूद यांची विकेट झटपट पडली. त्यामुळे पाकिस्तान संघ अडचणीत आला होता. मात्र सईम आयुब आणि कामरान गुलामने डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. कामरान गुलामचा हा पदार्पणाचा कसोटी सामना होता. या सामन्यात त्याने आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. कामरानने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात दमदार शतक ठोकलं. कामरानने डेब्यू सामन्याच्या पहिल्या डावातच शतक ठोकत इतिहास रचला आहे. पाकिस्तानकडून पाच वर्षानंतर डेब्यू सामन्यात शतक ठोकण्याचा कारनामा केला आहे. कामरानसाठी हे शतक महत्त्वाचं आहे, कारण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये बाबर आझमच्या जागी स्थान मिळालं आहे. कामरानवर अपेक्षांचं ओझं होतं मात्र त्याने व्यवस्थितरित्या पेललं.

कामरानने दोन विकेट गेल्यानंतर मैदानात पाय ठेवला आणि सावध सुरुवात केली. पण 15 व्या चेंडूवर षटकार मारत आपला हेतूही स्पष्ट केला. त्याने 104 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर आपलं कसोटी क्रिकेटमधील पहिल्या सामन्यात शतकही पूर्ण केलं. कामरान गुलाम डेब्यू सामन्यात शतक करणारा पाकिस्तानचा 13 वा फलंदाज आहे. तसेच पाकिस्तानमध्ये असा कारनामा करणारा 11वा खेळाडू आहे. इंग्लंडविरुद्ध डेब्यू कसोटीत शतक ठोकणारा पहिला पाकिस्तानी फलंदाज आहे. मुल्तानमध्ये 23 वर्षानंतर फलंदाजाने डेब्यू शतक ठोकलं आहे.

कामरान गुलामने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2023 वनडे सामन्यात पदार्पण केलं होतं. त्याला कन्कशन सब्सिट्यूट म्हमून मैदानात उतरण्याची संधी मिळाली होती. त्यावेळेस हारिस सोहेल दुखापतग्रस्त झाला होता. पण या सामन्यात कामरानला फलंदाजी आणि गोलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यानंतर कामरानला कधी संघात तर कधी बाहेर असा प्रवास सुरु होता. पण मुल्तान कसोटीत संधी मिळताच त्याचं त्याने सोनं केलं.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.