PAK vs ENG : दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर, बाबरसह चौघांची हकालपट्टी
Pakistan vs England Test Series : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाटी संघ जाहीर केला आहे. पीसीबीने या मालिकेतून बाबरसह चौघांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
इंग्लंड क्रिकेट टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. इंग्लंड पाकिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंड या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. इंग्लंडने पाकिस्तानवर मुल्तानमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. पहिल्या डावात 556 धावांनी पिछाडीवर असूनही इंग्लंडने हा सामना पाचव्या दिवसातील पहिल्या सत्रात डाव आणि 47 धावांनी जिंकला. पाकिस्तान या पराभवासह 500 पेक्षा धावा करुनही पराभूत होणारी पहिली टीम ठरली. पाकिस्तानला मायदेशातच अशा लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यानतंर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील 2 सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे.
पीसीबीने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. पीसीबीने शान मसूदच्या नेतृत्वात युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तर माजी कर्णधार बाबर आझम, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि सरफराज अहमद या चौकडीला तगडा झटका दिला आहे. निवड समितीने या चौघांना वगळलं आहे. सरफराजचा मुख्य संघात समावेश नव्हता. सरफराजचा राखवी खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रविवारी 13 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली. उभयसंघातील दुसरा सामनाही मुलतानमध्येच 15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
या चौघांना संधी
पीसीबीने बाबर, शाहीन, नसीम आणि सरफराज यांच्या जागी 4 नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. पीसीबीने प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, हसीबुल्लाह, मेहरन मुमताझ, कामरान गुलाम आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद अली याचा समावेश केला आहे. तसेच ऑफ स्पिनर साजित खान याला संधी मिळाली आहे. नोमान अली आणि जाहिद महमूद हे दोघे पहिल्या कसोटीसाठी मुख्य संघात होते. मात्र या दोघांना मुक्त करण्यात आलं आहे.
शेवटच्या 2 सामन्यांसाठी पाकिस्तान टीम
Pakistan name squad for 2nd and 3rd England Tests
Details here ➡️ https://t.co/vWp6IJeDkj#PAKvENG | #TestAtHome
— PCB Media (@TheRealPCBMedia) October 13, 2024
बाबर सुपर फ्लॉप
दरम्यान बाबरला गेल्या अनेक महिन्यांपासून काही खास करता आलेलं नाही. बाबरने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात अनुक्रमे 30 आणि 5 अशा एकूण 35 धावा केल्या. तर शाहिन अफ्रिदीला फक्त 1 विकेटच घेता आली होती.
कसोटी मालिकेतील दुसऱ्या-तिसऱ्या सामन्याचं वेळापत्रक
दुसरा सामना, 15 ते 19 ऑक्टोबर, मुल्तान
तिसरा सामना, 24 ते 28 ऑक्टोबर, रावळपिंडी
दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तान संघ : शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसीबुल्ला (विकेटकीपर), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), नोमान अली, सॅम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद मेहमूद.
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम : बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, गस एटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, जॅक क्रॉली, बेन डकेट, जोश हल, जॅक लीच, ओली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, ओली स्टोन आणि क्रिस वोक्स.