युवा ऑलराउंडर मैदानातून ते थेट रुग्णालयात, नक्की काय झालं?

सामन्यादरम्यान खेळाडूला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

युवा ऑलराउंडर मैदानातून ते थेट रुग्णालयात, नक्की काय झालं?
Image Credit source: फाईल फोटो
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 5:06 PM

इस्लामाबाद : क्रिकेट विश्वातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. सामन्यादरम्यान खेळाडूला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान हा सर्व प्रकार घडला. पाकिस्तानचा खेळाडू कामरान गुलामला (Kamran Gulam) मैदानातून थेट रुग्णालय गाठावं लागलं. कामरान हा आगा सलमानच्या जागी फिल्डिंगसाठी मैदानात आला होता. गुलामला सामन्यादरम्यान पोटदु:खीचा त्रास होऊ लागला. गुलामच्या आधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि शान मसूद हे दोघेही आजारी पडले. त्यामुळे या दोघांना तिसऱ्या दिवशी फिल्डिंगसाठी मैदानात येता आलं नाही. (pak vs nz 1st test pakistan kamran ghulam hospital know exactly reason)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) याबाबत एक पत्रक जारी करत गुलामच्या आजाराबाबत आणि हॉस्पिटलाईज केल्याची माहिती दिली. गुलामच्याआधी सलमान, बाबर आणि शान या तिघांना वायरलचा त्रास झाला. मात्र बाबर आता मैदानात परतलाय.

हे सुद्धा वाचा

बाबर-सलमानची शतकी खेळी

न्यूझीलंडने पहिल्या डावात 174 धावांची आघाडी घेतली. पाकिस्तानने पहिले बॅटिंग करताना 438 धावा केल्या. कॅप्टन बाबरने 161 आणि सलमानने 103 रन्स आणि सरफराज अहमदने 86 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

न्यूझीलंडने झोडला

न्यूझीलंड पुन्हा एकदा बॅटिंगसाठी मैदानात आली. दुसऱ्या डावात 9 विकेट्स गमावून 612 धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडने 612 धांवावरच डाव घोषित केला. न्यूझीलंडकडून केन विलियमसनने नॉट आऊट 200 आणि टॉम लॅथमने 113 धावांची शतकी खेळी केली. या व्यतिरिक्त डेव्हॉन कॉनव्हेने 92 आणि इश सोढीने 65 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर पाकिस्तानकडून अबरार अहमदने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

गुलाम न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील 16 सदस्यीय संघातील खेळाडू आहे. गुलामला कराची कसोटीत पदार्पणाची संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र गुलामची प्रतिक्षा आणखी लांबली. मात्र यानंतरही गुलामला मैदानात उतरण्याची संधी मिळाली. पण पोटाच्या समस्येमुळे गुलामला हॉस्पिटल गाठावं लागलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.