PAK vs NZ : 11 Six, 30 फोर, पाकिस्तानसाठी कर्दनकाळ, हाहाकारी शतक ठोकून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

PAK vs NZ T20 Series : T20 सीरीजमध्ये पाकिस्तानने विजयाने सुरुवात केली होती. त्यांनी 2-0 आघाडी घेतली होती. पण प्रत्येक चित्रपटात होतं, तसं अखेरीस हिरोने सर्वकाही बदलून टाकलं.

PAK vs NZ : 11 Six, 30 फोर, पाकिस्तानसाठी कर्दनकाळ, हाहाकारी शतक ठोकून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड
pak vs nz Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 11:27 AM

PAK vs NZ T20 Series : प्रत्येक स्टोरीमध्ये एक हिरो असतो. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये नुकतीच टी 20 सीरीज संपली. यात मार्क चॅपमॅन हिरो आहे. चॅपमॅनने हाँगकाँगसाठी आंतरराष्ट्रीय डेब्यु केला होता. पण नंतर त्याने न्यूझीलंडची जर्सी परिधान केली. आता हाच चॅपमॅन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठमोठ्या टीम्सची धुलाई करतोय. मार्क चॅपमॅनच्या रडारवर सध्या पाकिस्तानी टीम आहे.

टी 20 सीरीजमध्ये पाकिस्तानने विजयी सुरुवात केली होती. त्यांनी 2-0 ची विजयी आघाडी घेतली होती. पण जसं प्रत्येक चित्रपटात होतं, अखेरीस हिरो सर्वकाही बदलून टाकतो. मार्क चॅपमॅनने न्यूझीलंडसाठी तशीच हिरोपंती दाखवली.

पाकिस्तानला तडाखा

सीरीजच्या अखेरीस 5 व्या T20 मध्ये मार्क चॅपमॅनने पाकिस्तानला चांगलाच तडाखा दिला. डावखुऱ्या चॅपमॅनने फक्त 57 चेंडूत 104 धावा चोपल्या. त्याच्या T20 इंटरनॅशनल करिअरमधील हे पहिलं शतक आहे.

5 व्या विकेटसाठी पार्ट्नरशिपचा वर्ल्ड रेकॉर्ड

मार्क चॅपमॅनने आपल्या इनिंग दरम्यान 11 फोर आणि 4 सिक्स मारले. त्याशिवाय नीशामसोबत मिळून 5 व्या विकेटसाठी सर्वात मोठ्या पार्ट्नरशिपचा रेकॉर्ड केला. चॅपमॅन आणि नीशामने 5 व्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. याआधी हा रेकॉर्ड 119 धावांचा होता. पाकिस्तानचा मिस्बाह उल हक आणि शोएब मलिकच्या नावावर हा रेकॉर्ड होता.

न्यूझीलंडकडून कधीपासून खेळायला सुरुवात केली?

पाकिस्तानची धुलाई करणाऱ्या मार्क चॅपमॅनचा जन्म हॉन्गकॉन्गमध्ये झालाय. त्याने 2015 साली हाँगकाँगसाठी UAE विरुद्ध डेब्यु केला होता. 2018 पासून त्याने न्यूझीलंडकडून खेळायला सुरुवात केली. पाकिस्तान विरुद्ध 11 फोर, 30 सिक्स

पाकिस्तान विरुद्ध 5 T20 सामन्यांच्या सीरीजमध्ये मार्क चॅपमॅनने 165.71 च्या स्ट्राइक रेटने 290 धावा केल्या. या दरम्यान त्याने 11 सिक्स आणि 30 फोर मारले. चॅपमॅनने शेवटच्या टी 20 मध्ये शतक झळकावलं. त्याशिवाय 2 अर्धशतक सुद्धा फटकावली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.