Breaking : पाकिस्तानच्या संघाची घोषणा, तरबेज गोलंदाज बाहेर
पाकिस्तानच्या संघाची घोषणा करण्यात आलीय. यात कुणाला संधी मिळाली आहे, कुणाला वगळण्यात आलंय, हे जाणून घ्या....
नवी दिल्ली : नुकतीच भारत, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्ताननं टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) संघाची घोषणा केली आहे. त्यातच आता पाकिस्ताननं (Pakistan) देखील संघाची घोषणा केली आहे. पाकिस्ताननं आता आपल्या 15 खेळाडूंवर शिक्कामोर्तब केलाय. संघाचे कर्णधारपद बाबर आझमच्या (Babar Azam) हाती आहे. यात जे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या जाणाऱ्या आयसीसी स्पर्धेत संघाचा भाग असतील. संघ निवडीत झालेला जास्तीचा वेळा हा त्यांच्या खेळाडूंच्या दुखापती, त्यांचा फिटनेस आणि संघातील राजकारणाशी जोडला जातोय. या सर्वांचा परिणाम टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघावरही होतो. यामुळेच टी-20 विश्वचषकासाठी निवडलेला पाकिस्तान संघ आशिया कप संघापेक्षा थोडा वेगळा आहे.
पाकिस्तानच्या संघाची घोषणा
? JUST IN: Pakistan’s squad for the 2022 ICC Men’s #T20WorldCup is out.
Details ?
— ICC (@ICC) September 15, 2022
शान मसूदचा संघात समावेश
डावखुरा फलंदाज शान मसूदचा संघात समावेश केला आहे. मसूदने या वर्षी इंग्लंडपासून पाकिस्तानपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र, विशेष म्हणजे त्याने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळलेला नाही. तसेच त्याचा T20 स्ट्राईक रेट फक्त 126 आहे. तो अव्वल फळीतील फलंदाज आहे आणि बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या संथ फलंदाजीमुळे पाकिस्तानी संघ टीकेला सामोरे जात असताना त्याच्यासोबत अशाच आणखी एका खेळाडूची भर पडणे आश्चर्यकारक आहे.
पाकिस्तानचा संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदरी अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादिर
बहुतांश खेळाडूंना कायम ठेवले
पाकिस्तानं बहुतांश खेळाडूंना कायम ठेवले आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेले वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनियरचे पुनरागमन झाले आहे. या संघातून केवळ अनुभवी स्फोटक फलंदाज फखर जमानला वगळण्यात आले आहे. आशिया चषक स्पर्धेत झमानची कामगिरी अत्यंत खराब होती आणि त्याने हाँगकाँगविरुद्ध केवळ एक अर्धशतक झळकावले होते. त्याचा समावेश राखीव खेळाडूंमध्ये करण्यात आला आहे.
23 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकात पाकिस्तानची मोहीम सुरू होणार आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाला भारताचे आव्हान असेल. दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्नमध्ये होणार आहे. टी-20 विश्वचषकासाठी संघ निवडण्यासोबतच पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या 7 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठीही संघाची घोषणा केली आहे.